IND vs NZ : कसं जिंकणार वर्ल्डकप! ती चूक पाहिल्यानंतर भारतीय क्रीडाप्रेमींचा संताप

2 hours ago 1

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने एकदम खराब कामगिरीचं प्रदर्शन केलं. पहिल्याच सामन्यात भारतीय संघ छाप सोडण्यास अपयशी ठरला आहे. सराव सामन्यात विजय मिळवल्यानंतर ही कामगिरी पाहून हा तोच संघ आहे का? असा प्रश्न पडला आहे. पॉवरप्लेमध्ये खरं तर एक चूक होणं चांगलंच महागात पडू शकतं. याची जाणीव क्रीडाप्रेमींना आहे. त्यामुळे त्यांचा संताप होणं सहाजिकच आहे. न्यूझीलंड खेळत असलेल्या डावातील सहाव्या षटकात एक नाही तर दोन चुका घडल्या. रेणुका ठाकुर आणि ऋचा घोष यांचा खेळ पाहून तर क्रीडाप्रेमी वर्ल्डकप जिंकतील की नाही याबाबत शंका व्यक्त करू लागले आहेत. सहाव्या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर रेणुका ठाकुर सोपा चेंडू अडवू शकली नाही. त्याचा फटका असा बसला की न्यूझीलंडच्या खात्यात चार धावा गेल्या. त्यानंतर बरोबर दोन चेंडूनंतर विकेटकीपर ऋचा घोषने मोठी चूक केली. हातातला सोपा झेल सोडला.

अरुंधती रेड्डीच्या चेंडूवर सूजी बेट्सने शॉट मारला आणि चेंडू हवेत गेला. पण हा चेंडू पकडताना ऋचा घोष चुकली आणि झेल सुटला. सोपा झेल सोडल्याने क्रीडाप्रेमींचा संताप झाला आहे. त्यामुळे ऋचा घोष आणि रेणुका ठाकुर यांना ट्रोल केलं जात आहे. इतकंच काय तर, अशा पद्धतीने खेळून वर्ल्डकप जिंकता येईल का? याबाबतही शंका व्यक्त केली आहे. दरम्यान, भारतीय फलंदाजीही पूर्णपणे फेल गेली आहे. शफाली वर्माने तर दुसऱ्या षटकात विकेट देऊन मोकळी झाली. त्यानंतर विकेटची धडाधड लाईन लागील. 75 धावांवर निम्म्याहून अधिक संघ तंबूत होता. वाईट पराभव झाल्यास नेट रनरेटवरही परिणाम होणार आहे.

That was an casual drawback dropped by Richa Ghosh, followed by a elemental bound from Renkuka Singh.

The fielding present has been thing abbreviated of disastrous. pic.twitter.com/kUyDdnEA2J

— Vipin Tiwari (@Vipintiwari952) October 4, 2024

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.

न्यूझीलंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डेव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), जेस केर, रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article