इराणने मंगळवारी इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत तणाव वाढला आहे. (Image source- X)
Published on
:
02 Oct 2024, 8:24 am
Updated on
:
02 Oct 2024, 8:24 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : इराणने मंगळवारी इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत तणाव वाढला आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला या हल्ल्याची किंमच मोजावी लागेल, असा इशारा दिला आहे. यामुळे तेथील युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हाजरी जारी केली. सरकारने भारतीय नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून इराणला जाणे टाळावे, अशी सूचना केलीय. इराणमधील भारतीयांना सतर्क राहण्याचा आणि तेहरानमधील दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
इराणने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर दिल्लीतील इस्रायल दूतावासाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.