शेतकरी, व्यावसायिक, इंजिनियर आणि शिक्षक असलेले सुशिक्षित असलेल्या एकाच कुटुंबातील 58 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. (छाया : नरेंद्र पाटील)
Published on
:
20 Nov 2024, 11:32 am
Updated on
:
20 Nov 2024, 11:32 am
जळगाव : चोपडा (१०) अ.ज. (राखीव) विधानसभा २०२४ निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी एकाच कुटुंबातील 58 मतदारांनी एकाच वेळेस आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
चुंचाळे येथील महाजन परिवार सधन व आदर्श शेतकरी कुटुंब असून या परिवारातील 58 मतदारांनी एकाच वेळेस चुंचाळे ता. चोपडा जि. जळगाव येथील मतदान केंद्रावर जावून शंभर टक्के मतदान यशस्वी केले. चुंचाळे येथील महाजन परिवार निव्वळ शेतीवर अवलंबून नसून या परिवारातील अनेकजण शिक्षक असून परीवारातील तरुण इंजिनिअर, व्यावसायिक असून पुणे येथे वास्तव्य करत आहेत. अशा सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून एक आदर्श निर्माण केला आहे. या परिवारातील शंभर टक्के मतदान यशस्वी करण्यास शिक्षक जी. एस. महाजन, बी.जी. महाजन तसेच वासुदेव महाजन, राजेंद्र महाजन व जितेंद्र महाजन, अक्षय महाजन सुनील महाजन (पोलीस पाटील चुंचाळे) तेजस महाजन यांनी यशस्वी प्रयत्न करून गावात एक आदर्श निर्माण करून दिला आहे.