मोहोळमध्ये मतमोजणी प्रशिक्षण, 174 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग:24 फेऱ्यात होणार मतमोजणी, 113 पोलिसांचा बंदोबस्त‎

3 hours ago 1
मोहोळ विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम येथे होणार आहे. तत्पूर्वी शुक्रवारी मतमोजणीसाठी प्रशिक्षण घेण्यात आले. त्यात १७४ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी मतमोजणी निवडणूक निरीक्षक दर्शना भागलानी यांनी मार्गदर्शन केले. शनिवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. मतमोजणी केंद्रापासून १०० मीटर परिसरात पादचारी मार्ग तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी घोषित केला आहे. या मतमोजणीसाठी १४ टेबलची व्यवस्था केली असून याद्वारे २४ फेऱ्या होणार आहेत. पोस्टल मतमोजणीसाठी ७ टेबल, इ. टी. पी. बी.एस. साठी २ टेबलद्वारे मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणी प्रक्रियेत एका टेबलला ३ कर्मचारी,एक अधिकारी असे एकूण ५६ कर्मचारी, पोस्टलसाठी ३० कर्मचारी, अधिकारी इ. टी. पी. बी. एस.साठी आठ कर्मचारी, ईव्हीएम मशीनची ने-आण करण्यासाठी ५० कर्मचारी, सिलिंग करण्यासाठी ३० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. या सर्व यंत्रणेला राखीव ११० कर्मचारी ठेवले आहेत.मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी १३ पोलिस अधिकारी, १०० पोलिस कर्मचारी, एक दंगा काबू पथक,शहर परिसरात पेट्रोलिंग एक पथक, मतमोजणी परिसरात कडकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.हि निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी सिमा होळकर, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी सचिन मुळीक, नायब तहसीलदार सुधाकर धाईजे, नायब तहसीलदार अनिल शहापूरे, मंडल अधिकारी प्रकाश दळवे,मंडळ अधिकारी जे. एफ. नदाफ, निवडणूक महसूल सहाय्यक अजित वाघमोडे प्रयत्नशील आहेत. अफवा पसरविल्यास कारवाई ^नागरिकांनी चुकीच्या अफवा पसरवू नये. कोणत्याही खोट्या अफवांना बळी पडू नका. निवडणूक आयोगाची प्रतिमा मालिन होऊन, लोकशाही व लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.पारदर्शक मतमोजणीची प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू आहे. ईव्हीएम मशिन कोणत्याही नेटवर्कला कनेक्ट होत नाही. चुकीची माहिती व्हायरल करू नयेत. सीमा होळकर, निवडणूक निर्णय अधिकारी

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article