Jasprit Bumrah याला ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर ICCचं सर्वात मोठं गिफ्ट

1 hour ago 1

jasprit bumrah nary 1 bowler successful icc trial rankingImage Credit source: Bcci x Account

टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत आणि जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया दौऱ्याची शानदार सुरुवात केली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर ऑस्ट्रेलियात पहिल्या सामन्यात 295 धावांच्या सर्वात मोठ्या फरकाने विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. कर्णधार म्हणून जसप्रीत बुमराह याने दोन्ही डावात मिळून 8 विकेट्स घेतल्या. बुमराहला त्याच्या या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच ‘या पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यानंतर आता बुमराहला पुन्हा एकदा आनंदाची आणि सर्वात मोठी बातमी मिळाली आहे. आयसीसीने बुमराहला त्याच्या या कामगिरीचं सर्वात मोठं गिफ्ट दिलं आहे.

बुमराह पुन्हा नंबर 1

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पु्न्हा एकदा जगात भारी ठरला आहे. जसप्रीत बुमराह जगातील नंबर 1 गोलंदाज ठरला आहे. आयसीसीने बुधवारी 27 नोव्हेंबरला कसोटी क्रमवारी जाहीर केली. बुमराहने या रँकिंगमध्ये 2 स्थानांची झेप घेत नंबर 1 ठरला आहे. बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या कगिसो रबाडा आणि ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूड या दोघांना मागे टाकत अव्वल स्थानी झेप घेतली.

बुमराह आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत 883 रेटिंग पॉइंटसह पहिल्या स्थानी आहे. कगिसो रबाडा 872 रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या तर जोश हेझलवूड 860 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑफ स्पिनर आर अश्विन चौथ्या आणि रवींद्र जडेजा सातव्या स्थानी आहेत. रबाडाने 30 ऑक्टोबरला बुमराहला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं होतं. मात्र अवघ्या 27 दिवसांमध्ये बुमराहने त्याला जागतिक दर्जाचा गोलंदाज का म्हटलं जात? हे दाखवून आणि सिद्ध करुन दाखवलं आहे.

भारतीय फलंदाजांचीही मोठी झेप

टीम इंडियाच्या गोलंदाजांसह फलंदाजांनाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत केलेल्या कामगिरीचा फायदा रँकिंगमध्ये झाला आहे. यशस्वी जयस्वाल याने दुसऱ्या डावात 161 धावा केल्या. विराटने नाबाद शतक केलं. तर केएलने 77 धावा केल्या. या तिघांनी या खेळीसह फलंदाजांच्या क्रमवारीत झेप घेतली आहे.

जसप्रीत बुमराह जगात भारी

The Numero Uno successful the ICC Men’s Test Bowler Rankings 🔝

Jasprit Bumrah 🫡 🫡

Congratulations! 👏👏#TeamIndia | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/mVYyeioOSt

— BCCI (@BCCI) November 27, 2024

यशस्वीने 2 स्थांनाची झेप घेतली. यशस्वी यासह दुसर्‍या क्रमांकावर पोहचले आहेत. विराट 9 स्थानांच्या झेपेसह 13 व्या क्रमांकावर पोहचला आहे. तर केएल 13 स्थानांची मोठी झेप घेत 49 व्या क्रमांकावर पोहचला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article