Published on
:
27 Nov 2024, 12:34 pm
Updated on
:
27 Nov 2024, 12:34 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क - साऊथस्टार सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि नयनतारा (Nayanthara) यांच्यातील नेटफ्लिक्स डॉक्युमेंट्री 'नयनतारा- बियॉन्ड द फेरी टेल' चा वाद कोर्टात गेला आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये धनुषचा चित्रपट नानुम राउडी धान मधील काही सेकंदाचे क्लिप वापरण्यात आल्याचा दावा केला आहे. हे कॉपीराईटचे प्रकरण आता कोर्टात गेले असून मद्रास हायकोर्टामध्ये अभिनेत्री नयनतारा विरोधात धनुषने केस दाखल केली आहे.
डॉक्युमेंट्री नयनतारा- बियॉन्ड द फेरी टेल रिलीज करण्यात आले आहे. या सीरीजमध्ये धनुषच्या प्रोडक्शन हाऊसअंतर्गत चित्रपट नानुम राउडी धानचा एक ३ सेकेंदाचा क्लिप वापरण्यात आले आहे. कॉपीराईट्स वरून धनुषने नयनताराच्या टीमला नोटिस पाठवली आहे.
ज्यावर नयनताराने देखील पलटवार करत आपली प्रतिक्रिया दिली होती. तिने सांगितले होते की, सीन्स हटवण्यात आले आहेत. पण धनुषने सांगितले की, यासाठी ठोस पुरावा सादर करावा लागेल.
डॉक्युमेंट्री नयनतारा- बियॉन्ड द फेरी टेलचे प्रकरण
काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्स डॉक्युमेंट्री नयनतारा- बियॉन्ड द फेरी टेलमध्ये २०१५ मध्ये रिलीज झालेला चित्रपट नानुम राउडी धानचा एक ३ सेकंदाचे फुटेज वापरण्यात आले होते. या चित्रपटाचे निर्माते धनुष होता. तर नयनताराचे पती विग्नेश शिवानने याचे दिग्दर्शन केले होते.