Published on
:
27 Nov 2024, 2:19 pm
Updated on
:
27 Nov 2024, 2:19 pm
नागपूर : भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला बहाल केलेले बहुमोल स्वातंत्र, समान न्यायाचे तत्व, नागरिक म्हणून दिलेले अधिकार व यासमवेत दिलेली कर्तव्याची जबाबदारी याबाबत समाजातीाल प्रत्येक घटकात जनजागृती होणे आवश्यक आहे. राज्यघटनेची सर्व मूल्ये प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्याचा निर्धार करा असा संदेश माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
भारतीय संविधान अंगिकारुन आज 75 वर्ष झाली या औचित्याने शासनाने घर घर संविधान हा घेतलेला उपक्रम तेवढाच महत्वाचा असल्याचे प्रतिपादन आदिवासी व सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी केले. यावेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले.संविधान दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त घर घर संविधान उपक्रमाचा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उप संचालक विजय वाकुलकर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त डॉ. मंगेश वानखेडे, , सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, दिव्यांग यांचा प्रातिनिधीक सन्मान करण्यात आला.