शहर डीबी पथकाची कामगिरी
पुसद (Pusad Crime) : शहरातील वाढलेल्या गुन्हेगारी प्रवृतीच्या गुन्हेगारांवर आळा बसावा व शहरातील वाढती गुन्हेगारी कमी व्हावी या करीता शहर ठाणेदार उमेश बेसरकर यांनी प्रभावी गस्त (पेट्रोलींग) वाढवुन कडक कारवाई करण्याचे आदेश शहर पोलीस स्टेशनचे डी. बी. पथकास सुचना दिल्या त्याच सुचणे प्रमाणे (Pusad Crime) पुसद शहर डी. बी. पथक शहरात पेट्रोलींग करीत असताना डी. बी. पथकास गोपनिय बातमीदार यांचे कडुन खात्रीलायक खबर मिळाली की, एक ईसम हातात धारदार शस्त्र घेउन घातपात करण्याच्या इराद्याने संशईतरीत्या पुसद शहरातील आसेगावकर पेट्रोलंपपचे पाठीमागील परीसरात फिरत आहे.
असे माहीती वरुण घटनेचे गांभीर्य ओळखुन डी.बी.प्रमुख सपोनि निलेश देशमुख व डी.बी.स्टॉप. पथक यांनी अतिशय कौशल्यपुर्वक सापळा रचुन आरोपी देव दिलीप श्रिरामे वय 20 वर्षे रा. शिवाजीवार्ड पुसद पळुन जात असताना त्याला घातक शस्त्रासह अटक करुण त्याचेवर पोलीस स्टेशन पुसद शहर येथे अपराध क्र. 810/2024 कलम 4,25 शस्त्र अधिनियम 1959 प्रमाणे गुन्हा नोंद करुण पुढील तपास स.पो.नि.निलेश देशमुख डी. बी. स्टॉप करीत आहेत.सदरची कारवाई – पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधिक्षक, पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे यांचे (Pusad Crime) मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांचे सुचनाप्रमाणे डी.बी.प्रमुख सपोनि निलेश देशमुख, पो. हवा. प्रफुल इंगोलेर, पो.हवा. मनोज कदम, पो. हवा. राहुल भगत, पोकाँ. आकाश बाभुळकर पो. कॉ. शुध्दोधन भगत, पो.का., पो. कॉ, बद्रीनाथ निबोळे यांनी पार पाडली आहे.