रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये, या दोन्ही देशात युद्ध सुरू होऊन आता दोन वर्ष दोन महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे. मध्यंतरी युक्रेनकडून रशियावर करण्यात आलेल्या मिसाईल हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी चिरघळले, प्रत्युत्तरादाखल रशियानं प्रथमच युक्रेनवर हल्ला करण्यासाठी इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल (ICBM) चा वापर केला. रशियानं उचललेल्या या पावलामुळे संपूर्ण जागाची चिंता वाढली आहे.
रशियाकडून वापरण्यात आलेलं इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल हे लांब पल्ल्याचा मारा करण्यासाठी ओळखलं जातं. तसेच हे मिसाई अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे. रशिया युक्रेनवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं युक्रेनच्या गुप्तचर संस्थांनी म्हटलं आहे. त्यामुळे रशिया युक्रेनवर नूक्लियर अटॅक करू शकतो अशी शंका देखील व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या युद्धाकडे आता सर्व जगाचं लक्ष लागलं आहे. जर रशियानं युक्रेनवर अणूहल्ला केला तर जगात तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होईल, जाणून घेऊयात जर तिसरं महायुद्ध झालं तर जगातील कोणते देश सुरक्षित राहातील.
भारतात काय स्थिती असेल
जर तिसरं महायुद्ध झालं तर दक्षिण अशियामधील देशांचं सर्वात जास्त नुकसान होईल.भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तानकडे नूक्लियर पावर आहे. भारतदेखील अण्वस्त्र सज्ज देश आहे. दुसरीकडे चीनकडे देखील मोठ्याप्रमाणात अण्वस्त्राचा साठा आहे. त्यामुळे दक्षिण अशियाचं क्षेत्र तिसऱ्या महायुद्धामध्ये अतिशय संवेदनशील क्षेत्र ठरू शकतं. जर तिसरं महायुद्ध झालं तर दक्षिण आशियामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होऊ शकते. तसेच जे लोक या युद्धात वाचतील ते उपास मारीनं मरण्याची शक्यता आहे.अमेरिकेनं जपानवर जो अणू हल्ला केला होता, त्याची आजही तेथील नागरिकांना किंमत मोजावी लागत आहे.
जगातील सर्वात सुरक्षीत देश
अंटार्क्टिका: अंटार्क्टिकाची भौगोलिक रचनाच अशी आहे की, हे स्थान जगातील सर्वात सुरक्षित स्थळांपैकी एक आहे. आण्विक युद्धादरम्यान हे स्थान सर्वात सुरक्षित असणार आहे.अंटार्क्टिकाचा विस्तिर्ण भूप्रदेश लाखो निर्वासित लोकांना आपल्यात सामावून घेऊ शकतो.
आइसलँड: आइसलँडची भूरचना देखील अंटार्क्टिकासारखीच आहे, आइसलँड आपल्या विशिष्ट भूरचनेमुळे या भागात शरण घेतलेल्या लोकांचं अणूबॉम्ब सारख्या घातक शस्त्रांपासून संरक्षण करू शकतो.
न्यूझिलंड: न्यूझिलंड आपल्या तटस्थ अंतरराष्ट्रीय धोरणांमुळे तसेच प्राकृतिक रचनेमुळे सर्वात सुरक्षित देश मानला जातो. अणू युद्ध झाल्यास येथे लोक सुरक्षित राहू शकतात.
स्वित्झर्लंड: हा देश देखील आपल्या तटस्थ धोरणांसाठी ओळखला जातो. स्वित्झर्लंड भूभाग देखील तेथील लोकांचं अणूयुद्धापासून संरक्षण करण्यास सक्षम आहे.