टीम इंडियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-2025 कसोटी मालिकेची दणक्यात सुरुवात केली. टीम इंडियाने पर्थ कसोटीच्या चौथ्याच दिवशी विजय मिळवला आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तर आता दुसरा सामना हा 6 डिसेंबरपासून होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स टीम इंडिया सुद्धा ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. वूमन्स टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेला 5 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ही मालिका आयसीसी वूमन्स चॅम्पियनशीप स्पर्धेचा भाग आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे.
यास्तिका भाटीया
वूमन्स टीम इंडियाची विकेटकीपर बॅट्समन यास्तिका भाटीया हीला दुखापतीमुळे या दौऱ्याला मुकावं लागलं आहे. यास्तिका भाटीया हीला मनगटाच्या दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे, अशी माहिती बीसीसीआयने सोशल मीडियावरुन दिली आहे. यास्तिका बाहेर झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का लागला आहे. तर यास्तिकाच्या जागी बदली खेळाडूचाही समावेश करण्यात आलं आहे. यास्तिकाच्या जागी उमा चेत्री हीला संधी देण्यात आली आहे.
यास्तिकाला वूमन्स बीग बॅश लीग 2024 स्पर्धेत दुखापत झाली होती.यास्तिकाला या दुखापतीमुळे बीग बॅश लीग स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं होतं. इतकंच नाही, तर त्याआधी यास्तिकाला गुडघ्याच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान 5 महिने टीमपासून दूर रहावं लागलं होतं. त्यानंतर यास्तिकाने कमबॅक करत ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी मिळवली, मात्र इथेही दुखापतीने डोकं वर काढलं. त्यामुळे तिला कमबॅकसाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
टीम इंडियाला मोठा झटका
🚨 News 🚨
Squad Update: Uma Chetry replaces injured Yastika Bhatia#TeamIndia | Read More 🔽
— BCCI Women (@BCCIWomen) November 27, 2024
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 5 डिसेंबर, ब्रिस्बेन
दुसरा सामना, 8 डिसेंबर, ब्रिस्बेन
तिसरा सामना, 11 डिसेंबर, पर्थ
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रिया पुनिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, राधा यादव, तितास साधू, उमा चेत्री (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकुर आणि सायमा ठाकोर.