आरक्षणासाठी जर एखाद्या व्यक्तीने धर्मांतर करत असेल तर त्याला आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एका सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं आहे. ”नियमितपणे चर्चला जाणारी आणि ख्रिश्चन धर्माच्या परंपरांचे पालन करणारी व्यक्ती हिंदू असल्याचा दावा करून अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नसल्याचे कोर्टाने सांगितले आहे.
मद्रास उच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत घेतलेल्या एका निर्णयाला आव्हान देणारी याचिका पुदुच्चेरी येथील सी सेलवरानी यांनी दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या खंडपीठाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.