वाशिमच्या कार्यकारी अभियंता यांच्या भरारी पथकाकडून शहर पोलीस ठाण्यात फिर्याद, गुन्हा दाखल
पुसद (Pusad Crime) : शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या व अत्यंत उच्चभ्रू वस्ती असलेल्या पांडे लेआउट येथील विद्युत महामंडळाचे (Pusad Crime) महावितरण चे ग्राहक सतीश प्रभाकर प्रतापवार वय 39 वर्ष रा. मोतीनगर पुसद यांच्याविरुद्ध फिर्यादी सतीश प्रभाकर मोरे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भरारी पथक वाशिम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 11 नोव्हेंबर च्या 12:30 वाजता दरम्यान त्यांच्या घरी रेड केली असता. त्यांनी आपल्या घरगुती वापराच्या मीटरमध्ये छेडछाड करून तब्बल एक लाख 58 हजाराची वीज चोरी केल्याचा प्रकार उभे केस आला होता. याप्रकरणी त्या ग्राहकास महावितरण ने तडजोडीची रक्कम सांगितली होती.
त्यावेळी मीटर तपासणी करिता गेलेल्या पथकास सदर बाब निदर्शनास आली. त्यावेळी सौ नीता शुभम प्रतापवार हे (Pusad Crime) घरगुती वीज वापर करीत होते. त्यांचा वीज मीटरचा ग्राहक क्रमांक 38602458 0798 असा आहे. त्याची तपासणी केली असता मीटर क्रमांक 12711796 मेक बेन्टेक्स कॅपॅसिटी 05-30 aempi रेवोल्युशन 3200impi /kwh ब मिटर आहे. त्यावेळी घटनास्थळ पंचनामा पंचायत समक्ष करून वापरत असलेले ते मीटर जप्त करण्यात आले. सूर्यकांत प्रतापराव यांनी कंपनीच्या परवानगीशिवाय जाणून बुजून अधिकृतपणे वीज चोरी केली आहे. त्यामध्ये त्यांनी मागील सहा महिन्यापासून 4401 युनिट प्रमाणे एक लाख 58 हजार सत्तर रुपयाची वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांनी त्याचा भरणा 25 नोव्हेंबर रोजी महावितरण कडे केलेला आहे.मात्र एकूण जोडभार हा 3.820 किलो वॅट असून तडजोड रक्कम 80 हजार रुपये याचा त्यांनी भरणा केलेला नाही.
त्यामुळे त्यांच्याविरुद्ध पुसद शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक806/2024 विद्युत कायदा 2003 सुधारित2007चे कलम135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा (Pusad Crime) अधिक तपास उपयोगी पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार उमेश बेसरकर हे करीत आहेत. सदरच्या कारवाईमध्ये विद्युत विभागाच्या भरारी पथकामधील अतिरिक्त कार्यकारी अभियंता सतीश मोरे, सुभाष विश्राम खराटे सहायक अभियंता, अभिजीत नारायण ब्राह्मणे सहाय्यक सुरक्षा रक्षक व अंमलबजावणी अधिकारी, सचिन गणेश कुबडे वरिष्ठ तंत्रज्ञन, व संदीप रावसाहेब देशमुख तंत्रज्ञ महावितरण हे सहभागी झाले होते.