सय्यद मुश्ताक अली देशांतर्गत टी20 स्पर्धेत थरारक सामन्याचं दर्शन क्रीडाप्रेमींना घडलं. या स्पर्धेत तामिळनाडू आणि बरोडा हे संघ आमनेसामने आले होते. बरोडा संघाचं नेतृत्व हार्दिक पांड्या आणि तामिळनाडूचं नेतृत्व शाहरूख खानच्या खांद्यावर आहे. नाणेफेकीचा कौल तामिळनाडूच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तामिळनाडूकडून एन जगदीसनने तुफान खेळी केली. त्याने 32 चेंडूत 5 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 57 धावांची खेळी केली.तामिळनाडूने 20 षटकात 6 गडी गमवून 221 धावा केल्या आणि विजयासाठी 222 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान बरोड्याने शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. एका चेंडूत चार धावांची आवश्यकता असताना अतित शेठने शेवटच्या चेंडूवर चौकार मारला आणि थरारक विजय मिळवून दिला. या सामन्यात हार्दिक पांड्याने 30 चेंडूत 7 षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने 69 धावा केल्या. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
तामिळनाडूकडून एम मोहम्मद शेवटचं षटक टाकत होता. 6 चेंडूत 9 धावांची आवश्यकता होती. पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्याची विकेट मिळाली. दोन धावा घेताना विजय शंकरने त्याला रन आऊट केलं. त्यानंतर अतित शेठ फलंदाजीसाठी आला आणि स्ट्राईक मिळाली. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अतित शेठने एक धाव घेतली आणि लिम्बानीला स्ट्राईक दिली. तिसरा चेंडू निर्धाव गेला. चौथा चेंडू वाईड टाकला आणि एक धावा आली. त्यामुळे पुन्हा चौथा चेंडू टाकावा लागला आणि लिम्बाने लेग बाईजवर एक धाव घेत अतिकला स्ट्राईक दिली. दोन चेंडू आणि सहा धावा अशी स्थिती होती. अतित शेठने पाचव्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. त्यामुळे 1 चेंडू आणि 4 धावा अशी स्थिती आली. अतित शेठने शेवटच्या चेडूंवर चौकार मारला आणि विजय मिळवून दिला.
ATIT SHETH SMASHED BOUNDARY WHEN BARODA NEEDED 4 RUNS IN THE FINAL BALL 👌
– What a lucifer successful SMAT, Hardik Pandya is conscionable bosing the tournament. pic.twitter.com/4gdMll5QBh
— Johns. (@CricCrazyJohns) November 27, 2024
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
तामिळनाडू (प्लेइंग इलेव्हन): बाबा इंद्रजीथ, एन जगदीसन (विकेटकीपर), बूपती कुमार, रितिक इसवरन, शाहरुख खान (कर्णधार), विजय शंकर, एम मोहम्मद, वरुण चक्रवर्ती, रविश्रीनिवासन साई किशोर, गुर्जपनीत सिंग, संदीप वॉरियर.
बडोदा (प्लेइंग इलेव्हन): निनाद अश्विनकुमार रथवा, मितेश पटेल (विकेटकीपर), शिवालिक शर्मा, कृणाल पंड्या (कर्णधार), अतित शेठ, हार्दिक पंड्या, विष्णू सोलंकी, भानू पानिया, महेश पिठिया, राज लिंबानी, लुकमान मेरीवाला.