जगातील प्रत्येक देशात काही ना काही रहस्यमयी गोष्टी घडत असतात. त्याच्या मागे अनेक अख्यायिका आणि दंतकथाही असतात. त्यामुळे भय आणि दहशत निर्माण होते. अशा गोष्टींवर लोक विश्वास ठेवतात आणि मग वर्षानुवर्ष त्या रहस्यमयी गोष्टीची दहशत कायम राहते. तुम्ही पेरू येथील नाजका लाइन्स, स्कॉटलँड येथील लॉक नेस सारख्या अनोख्या रहस्यमयी जागांबाबत तुम्ही ऐकलं असेलच. पण कधी आपल्या शेजारच्या नेपाळमधील रहस्यमयी जागेबाबत ऐकलं आहे का? नेपाळच्या आर्य घाट आणि देवी घाटाबाबतच्या अनेक अख्यायिका आहेत. या ठिकाणी लोक अर्ध्या रात्री पांढरे शुभ्र वस्त्र घालून फिरत असतात. त्यामुळेच येथील नागरिक सूर्यास्त होताच घराबाहेर पडत नाहीत. त्यांच्या मनात भीती निर्माण होते.
आर्य घाट, पशुपतिनाथ मंदिर
नेपाळमधील रहस्यमयी आणि भयानक गोष्टींची जेव्हाही चर्चा होते, तेव्हा सर्वात आधी उल्लेख पशुपतिनाथ मंदिराच्या जवळच्या आर्य घाटाचा होतो. पशुपतिनाथ मंदिर हे सुमारे 5 हजार वर्षापूर्वीचं आहे. केवळ नेपाळीच नव्हे तर भारतीय नागरिकांसाठीही पशुपतिनाथ मंदिर हे श्रद्धेचं ठिकाण आहे. या ठिकाणी रोज हजारो मृतदेह जाळले जातात.
आर्य घाटाची अनोखी कहाणी
आर्य घाटाची अनोखी कहाणी अत्यंत रोचक आहे. या ठिकाणी रोज डझनभराहून अधिक मृतदेह जाळले जातात. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी अर्ध्या रात्री लोकांचे संवाद ऐकू येतात. तसेच किंचाळ्याही ऐकायला येतात. सूर्यास्त होताच या घाटावरचं चित्र भेसूर दिसू लागतं. सर्वत्र स्मशान शांतता पसरते. त्यामुळेही ही जागा अत्यंत भयानक वाटते. आर्य घाटाच्या आसपास सफेद कपड्यात काही लोक फिरतात असं सांगितलं जातं.
देवी घाट, चितवन
नेपाळची दुसरी रहस्यमयी जागा म्हणजे चितवनमधील देवी घाट ही आहे. पशुपतिनाथ मंदिरांसारखीच देवी घाट ही हिंदुंचे धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र बनले आहे. या ठिकाणीही दरवर्षी लाखो लोक फिरायला येतात.
देवी घाटचं रहस्य
आर्य घाटाची कहाणी अत्यंत भयानक आहे. तशीच देवी घाटाचीही आहे. 2009मध्ये देवी घाटावर एका व्यक्तीची खोपडी सापडली होती. त्यामुळे या ठिकाणीही भूताखेतांचा वावर असल्याचं सांगितलं जातं. मध्यरात्रीच्यावेळी या ठिकाणी अनेक महिला नाचतात असं सांगितलं जातं. तसेच नाचताना या महिला आपल्या भोवती आग लावतात असंही सांगितलं जातं. या गोष्टी घडत असल्यामुळेच रात्रीच्यावेळी या ठिकाणी कोणी जात नाही.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)