मागील तीन विधानसभा निकालात देशमुख द्वितीय क्रमांकाचे मते घेणारे उमेदवार
रिसोड (Risod Assembly election) : राज्यात विधानसभेची निवडणूक आटोपली महायुतीने घवघवीत यश प्राप्त केले. या सर्व विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस ठरले. रिसोड मालेगाव विधानसभेत त्यांच्या निर्देशानुसार अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख (Anantrao Deshmukh) यांनी क्रमांक दोनची मते घेत विजयाच्या जवळ झेप घेतली होती. संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला फायदा झाला आणि मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडून आले.
तसेच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये १००० च्या वर अपक्ष उमेदवार उभे होते परंतु महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण आहे जिथे अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांनी ७०६७३ एवढी विक्रमी मते घेतली. बाकी इतर ठिकाणी उभे राहिलेले अपक्ष उमेदवार चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फेकल्या गेले. अनंतराव देशमुख यांनी दीड वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश त्यानंतर रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून ॲड. नकुल अनंतराव देशमुख यांच्याकडे जबाबदारी आली दीड वर्षात त्यांनी मोठ्या प्रमाणात गाव वाडी वस्ती पिंजून काढून भारतीय जनता पक्ष मजबूत करत युवकांची फळी तयार केली, सोबतच मोठ्या प्रमाणात महिला भगिनी पक्ष सोबत जोडल्या.
तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून मतदार संघातील बहुतांश गावात मूलभूत सुविधा बाबतीत असलेल्या समस्या दूर होतील असे विकास कामे साठी निधी मंजूर करून आणला. तसेच अनेक महत्त्वाचे गावाला जोडणारी रस्त्याचे कामेही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मंजूर करून आणून कामे पूर्णत्वास नेली. मालेगाव शहराचे पाणीपुरवठा असो किंवा रिसोड शहराचा वाढीव पाणीपुरवठा तसेच दलित वस्तीतील कामे असे अनेक विकास निधी नकुल देशमुख यांनी खेचून आणली.
विधानसभा निवडणूक पूर्वी अनेक घडामोडी घडल्या अनेक राजकीय परिस्थिती निर्माण झाल्या त्यात राज्यातील भाजपच्या वरिष्ठ मंडळीच्या निर्देशानुसार अनंतराव देशमुख यांना अपक्ष उभे राहावे लागले. त्यात त्यांनी लक्षणीय आणि छाप सोडणारी मते घेतली आणि विजयाच्या जवळ जाऊन त्यांना पुन्हा पराभव पदरी पडला. परंतु त्यांना पडलेल्या या भरघोस मतात ॲड. नकुल देशमुख यांचे संघटन आणि नियोजन हा विशेष करून होता.
पराभव झाल्यानंतर रिसोड आणि मालेगाव विधानसभेतील सामान्य भाजप कार्यकर्त्यांना आता पदाची उणीव भासत आहे त्यामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता तसेच सामान्य मतदार हा मजबूत होण्यासाठी भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणुक प्रमुख ॲड नकुल देशमुख यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांच्यावर आणि भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यावर झालेला अन्याय दूर करावा अशी मागणी जनसामान्य भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून राज्याचे शीर्ष नेतृत्व देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना होत आहे.
भाजप नेते ॲड नकुल देशमुख यांनी मागील एक ते दोन वर्षात घेतलेली मेहनत बघता त्यांनी तयार केलेले संघटन बघता आणि भारतीय जनता पक्ष मजबूत स्थितीत पोहोचवण्यासाठी त्यांनी घेतलेली परिश्रम आणि सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन चालण्याची कार्यशैली, भाजप कार्यकर्त्याला रिसोड मालेगाव विधानसभेत आधार म्हणून आणि बळ म्हणून ॲड नकुल देशमुख यांना देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे विधान परिषदेवर घेतील असा विश्वास भाजप पदाधिकारी सामान्य कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात मतदार म्हणून उभे राहिलेले जनसामान्य असा विश्वास व्यक्त करत आहेत.