हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय:लाच प्रकरणात केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयातील अधीक्षकाला जामीन मंजूर
2 hours ago
1
हिंगोली येथील केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयातील अधीक्षकाला लाच घेतल्या प्रकरणात बुधवारी तारीख 27 जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. माने गाडेकर यांनी जामीन मंजूर केला आहे. हिंगोली येथील केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयातील अधीक्षक मनोज मगरे यांनी तक्रारदाराकडून त्याच्या कंपनीची नोंदणी रद्द न करण्याचा प्रस्ताव न पाठविल्याबद्दल दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. संबंधित तक्रारदाराने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती. त्यावरून लाच लूचपत विभागाचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलीस निरीक्षक प्रफुल अंकुशकर, विनायक जाधव यांच्या पथकाने कार्यालय अधीक्षक मनोज मगरे यास ता २५ नोव्हेंबर रोजी दहा हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले होते. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्याच्या छत्रपती संभाजीनगर येथील घराची तपासणीमध्ये केली होती. यामध्ये ५६ हजार रुपये रोख व दागिने आढळून आले. दरम्यान त्याला आज हिंगोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. मगरे याच्या वतीने ॲड मनिष साकळे यांनी जामीनासाठी अर्ज सादर केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्या नंतर न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्याचा जामीन मंजूर केला आहे. अधिक्षक मगरे यांच्या वतीने ॲड मनीष साकळे यांनी काम पाहिले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)