रांची (Jharkhand Assembly Elections) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान झाले आहे. 13 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात 81 विधानसभा मतदारसंघांपैकी (Jharkhand Assembly Elections) 43 जागांवर मतदान झाले आहे. दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात 38 जागांवर मतदान होत आहे. झारखंडमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 61.47 टक्के मतदान झाले आहे.
महेशपूरमध्ये सर्वाधिक 74.00 टक्के मतदान झाले आहे, तर धनबादमध्ये सर्वात कमी 45.14 टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठीही आज मतदान होत आहे. यासोबतच आज 4 राज्यांतील 15 विधानसभेच्या (Jharkhand Assembly Elections) आणि लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निवडणुकीचे निकालही जाहीर होणार आहेत.
60.79 लाख महिला मतदार मतदानासाठी पात्र
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या (Jharkhand Assembly Elections) दुसऱ्या टप्प्यात 60.79 लाख महिला आणि 147 तृतीय लिंग मतदारांसह एकूण 1.23 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहेत. मुख्यमंत्री आणि JMM नेते हेमंत सोरेन, त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन आणि भाजपचे विरोधी पक्षनेते अमर कुमार बौरी यांच्यासह एकूण 528 उमेदवार निवडणुकीच्या या टप्प्यात आपले नशीब आजमावत आहेत.