अफवा ही केवळ अफवाच असते…;  ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या बातम्यांवर अमिताभ बच्चन यांनी सोडले मौन

5 hours ago 1

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिषेक आणि ऐश्वर्या घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या आराध्याच्या वाढदिवसाला बच्चन कुटुंबीयांपैकी कुणीच नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आले. अखेर अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या बातम्यांवर भाष्य केले आहे, मात्र ब्लॉगमध्ये त्यांनी मुलगा आणि सुनेचा उल्लेख केलेला नसला तरी त्यांच्या या पोस्टला घटस्फोटाच्या मुद्दय़ाशी जोडले जात आहे.

अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये म्हटलेय, ‘मी माझ्या कुटुंबाबद्दल सार्वजनिकरीत्या क्वचितच बोलतो. कारण तो माझा निर्णय आहे आणि मी तो आयुष्यभर पाळला. आजकाल सत्य जाणून न घेता अफवा पसरवल्या जातात. अफवा ही केवळ अफवाच असते. जी कोणतेही सत्य जाणून न घेता पसरवली जाते. पडताळणी करणे हे तुमचे काम आहे. म्हणून मी तुमच्या कामाला आव्हान देणार नाही आणि तुम्ही करत असलेल्या समाजकार्याचीही प्रशंसाच करतो.’

‘पुढे त्यांनी लिहिलेय, कोणत्याही माहितीत प्रश्नचिन्हांचा वापर करून, तुम्ही स्वतःसाठी सुरक्षिततेची भिंत तयार करता. तुमचा सरळ अर्थ असा आहे की, तुम्ही काय लिहिले आहे हा प्रश्न आहे. परंतु वाचकांनी ते खरे मानले पाहिजे अशी तुमची इच्छा असते. जेणेकरून तुमच्या मुद्दय़ाला महत्त्व प्राप्त होईल. जेव्हा कोणी ते वाचून त्यावर कमेंट करते याचा अर्थ ती गोष्ट प्रमोट होत आहे. याने तुमचे काम संपले. पण या गोष्टीचा एखाद्या व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर काय परिणाम होईल याचा विचार केला जात नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article