बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला कसोटी सामना हा पर्थ येथे खेळवणयात येत आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. टीम इंडियाकडून नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा या दोघांनी कसोटी पदार्पण केलं. तर ऑस्ट्रेलियाकडून नॅथन मॅकस्वीनी याने डेब्यू केलं आहे. टीम इंडियाचे 2 प्रमुख खेळाडू या सामन्याला मुकले आहेत. नियमित कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक कारणामुळे उपस्थित नाही. तर शुबमन गिल यालाही पर्थ कसोटीतून बाहेर रहावं लागलं आहे. शुबमनबाबत बीसीसीआयने काय माहिती दिलीय? हे जाणून घेऊयात.
शुबमन गिलला दुखापत
शुबमन गिल याच्या बोटाला दुखापत झाली आहे. गिल या दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नव्हता. या पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाने जोरदार सराव केला. शुबमन गिल याला या सरावादरम्यान दुखापत झाली. गिल या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे गिलचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. बीसीसीआयचं वैद्यकीय पथक शुबमनवर लक्ष ठेवून आहे”, अशी माहिती बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे.
दुसऱ्या सामन्याला मुकणार?
पर्थ कसोटीत रोहितच्या जागी केएल राहुल तर शुबमन गिल याच्या जागी देवदत्त पडीक्कल फलंदाजीसाठी आला. रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीआधी भारतीय संघासह जोडला जाणार असल्याची चर्चा आहे. दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. मात्र शुबमनच्या बोटाला झालेली दुखापत पूर्णपणे बरी झाली नाही, तर त्याला दुसऱ्या सामन्यालाही मुकावं लागू शकतं.
शुबमन गिल दुखापतीमुळे आऊट
UPDATE: Shubman Gill sustained a near thumb wounded during Day 2 of lucifer simulation astatine The WACA. He was not considered for enactment for the archetypal Test of the Border-Gavaskar Trophy.
The BCCI Medical Team is monitoring his advancement connected a regular basis.#TeamIndia | #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवुड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कॅप्टन), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज.