Video : विराट कोहली कोण होतास तू, काय झालास तू? बॅटिंगमध्ये तर फेल गेला आणि मोक्याच्या क्षणी नको ते केलं

5 hours ago 1

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानात सुरु आहे. या सामन्यात भारताने खरं तर साजेशी कामगिरी केली असं म्हणायला हरकत नाही. भारताचा संपूर्ण संघ 150 धावांवर बाद झाला. पण जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. पण विराट कोहलीकडून मोक्याच्या क्षणी मोठी चूक झाली.

 विराट कोहली कोण होतास तू, काय झालास तू? बॅटिंगमध्ये तर फेल गेला आणि मोक्याच्या क्षणी नको ते केलं

Image Credit source: video grab

| Updated on: Nov 22, 2024 | 3:18 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पहिल्याच दिवशी रंगतदार वळणावर आला आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियात तग धरून खेळतील का? असा प्रश्न आधीपासूनच क्रीडाप्रेमींना पडला होता. झालंही तसंच. भारताचा संपूर्ण संघ 150 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे पहिल्याच दिवशी हातातून सामना गेला असं भारतीय क्रीडाप्रेमींना वाटलं होतं. पण नाही. भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कमबॅक केलं. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचं कंबरडं मोडलं. एकीकडे 150 धावांचं सोपं टार्गेट असताना अवघ्या 50 धावांच्या आत निम्म्याहून अधिक संघ तंबूत पाठवला. जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीचं नजराणा क्रीडाप्रेमींना पाहायला मिळाल. खरं तर या कसोटी मालिकेत विराट कोहलीकडून फार अपेक्षा आहेत. मात्र पहिल्याच सामन्यात फेल गेला. विराट कोहलीला सूर गवसल्याचं वारंवार दिसून आलं आहे. मात्र मागचा अनुभव पाहता त्याला वारंवार संधी दिली जात आहे. विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात काही खास करू शकला नाही. 12 चेंडूंचा सामना करून अवघ्या 5 धावा करून बाद झाला. इथपर्यंत सर्वकाही ठीक होतं. पण क्षेत्ररक्षणातही नको ती चूक करून बसला.

जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीचा सामना करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांची तारांबळ उडाली होती. संघाच्या तिसऱ्या आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने नाथन मॅकस्वीनेला बाद केलं. त्याला पायचीत करत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर मार्नस लाबुशेन मैदानात आला. याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर लाबुशेन चुकला आणि बॅटचा कोपरा लागून थेट विराट कोहलीच्या हातात चेंडू गेला. दुसऱ्या स्लिपला असलेल्या विराट हा झेल सहज पकडेल असं वाटत होतं आणि सेलिब्रेशनही सुरु झालं होतं. पण विराट कोहलीने झेल सोडल्याचं पाहून खेळाडूंचा भ्रमनिरास झाला.

One of the much bonzer drops you’ll see! #AUSvIND pic.twitter.com/LdxmEYeWQx

— cricket.com.au (@cricketcomau) November 22, 2024

मार्नस लाबुशेनची विकेट वाचली असली तरी दुसऱ्या बाजूला धडाधड विकेट पडत होत्या. उस्मान ख्वाजाची विकेट पडली. त्यानंतर आलेल्या स्टीव्ह स्मिथला खातही खोलता आलं नाही. हार्षित राणानेही पदार्पणाच्या सामन्यात हात लाल केला. ट्रेव्हिस हेडची बाद करत विकेटचा नारळ फोडला. त्यानंतर आलेला मिचेल मार्शही काही खास करू शकला नाही. मार्श 6 धावा करून बाद झाला. दुसरीकडे, मार्नस लाबुशेन तग धरून होता. 50 चेंडूंचा सामना करून 2 धावा केल्या होत्या. तिसऱ्या सेशनच्या सुरुवातील सिराजने त्याला पायचीत केलं आणि त्याचा खेळ आटोपला. लाबुशेनने 52 चेंडूत 2 धावा करून बाद झाला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article