बॉर्डर-गावस्कर मालिकेचा श्रीगणेशा झाला आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर दुसरीकडे उस्मान ख्वाजा हा ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करत आहे. हे दोन्ही संघांनी या मालिकेसाठी कसून सराव केला आहे. या मालिकेत खेळणे एक सन्मान आहे. तर यंदा या मालिकेत प्रेमाचे सूर पण कानी गुंजणार आहे. क्रिकेट प्रेमींना मैदानावरच पती-पत्नीची अनोखी केमिस्ट्री पाहायला मिळेल. पत्नी या मालिकेत समालोचन करले तर पती मैदानावर त्याच्या संघासाठी धावा चोपणार आहे.
सर्वांचे काँमेंट्रीकडे लक्ष
हे सुद्धा वाचा
या मालिकेत जसप्रीत बुमराह, विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्स यासारखे खेळाडू मैदान गाजवण्याची दाट शक्यता आहे. तर मैदानाबाहेर मार्क वॉ, अॅडम गिलख्रिस्ट, वसीम अक्रम, सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री सारख्या दिग्गजांचे धावते समालोचन या सामन्यांची रंगत वाढवतील. यात अजून खास गोष्ट घडत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार उस्मान ख्वाजा मैदान गाजवत असताना त्याची पत्नी रेचेल ख्वाजा या अविस्मरणीय क्षणाचे वर्णन तिच्या गोड आवाजात प्रेक्षकांपर्यंत पोहचवणार आहे. रेचेल बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये समालोचन, काँमेंट्री करणार आहे. या मालिकेत पहिल्यांदाच असी केमिस्ट्री जुळून आली आहे.
उस्मानची बॅट तळपणार
उस्मान ख्वाजा अजून भारताविरोधात सूर गवसलेला नाही. त्याची आतापर्यंतची कामगिरी समाधानकारक नाही उलट सुमार म्हटली जावी अशी झाली आहे. त्यावर वृत्तपत्रांनी रकानेच्या रकाने खर्ची केले आहे. डावखुऱ्या फलंदाजाला भारताविरोधात मोठी कामगिरी बजावता आली नाही. 9 कसोटीत अगदी 34 धावांच्या हिशोबाने त्याने 544 धावा खात्यात जमा केल्या आहेत. त्याने 9 शतकांची कामगिरी बजावली आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ही त्याला कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी नामी संधी आहे.
Husband – Usman Khawaja volition play the Border Gavaskar Trophy.
Wife – Rachel Khawaja volition bash commentary for Border Gavaskar Trophy. pic.twitter.com/42gJBbvQIV
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 21, 2024
पत्नी करणार कॉमेंट्री
उस्मान ख्वाजाला भारताविरुद्ध त्याचा ट्रॅक रेकॉर्ड सुधारण्याची संधी असतानाच पत्नीची कॉमेंट्री ऐकण्याची पण संधी मिळाली आहे. तो मैदानावर असताना पत्नीच्या गोड आवाजाचा करिष्मा झाला तर नवल वाटायला नको. रेचल ही एक टीव्ही होस्ट आहे. यापूर्वी तिने अनेक सामन्यांचे समालोचन केले आहे. आता या सामन्यात पती मैदानावर तर पत्नी कॉमेंट्री करताना पाहायला मिळले. त्याची उत्सुकता सर्व क्रिकेट प्रेमींना लागली आहे. दुसरीकडे बुमराह याच्या नेतृत्वात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीची निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन टीकाकार आणि पत्रकारांना कामगिरीतून उत्तर देण्याची संधी भारतीय खेळाडूंकडे आहे.