Kalameshwar Police: चेन स्नेचिंगची 6 महिन्यातील दुसरी घटना; पोलिसांच्या धाकावर प्रश्नचिन्ह

2 hours ago 1

कळमेश्वरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले

कळमेश्वर (Kalameshwar Police) :  कळमेश्वर ब्राह्मणी शहरातील गजबजलेल्या शिक्षक कॉलनी परिसरातील दुर्गा मंदिरात दुर्गा मातेची ओटी भरण्यासाठी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र मोपेड दुचाकी वर पाठीमागून येऊन महिलेला छातीवर धक्का देत गळ्यातील मंगळसूत्र तोडून अज्ञात चोरटे धुम स्टाईल पसार झाल्याची घटना दिनांक 8 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी सहा वाजता घडली.

गस्त वाढवण्याची नागरिकांची मागणी

माहितीनुसार, ब्राह्मणी शिक्षक कॉलनी येथे राहणाऱ्या सौ कुमुद सतीश धोटे वय 47 वर्ष या गृहिणी आहेत नवरात्र उत्सव सर्वत्र साजरा होत असताना घराजवळच असलेल्या दुर्गा मंदिरात दुर्गा मातेची ओटी भरण्यासाठी दिनांक आठ रोजी सकाळी सहा वाजता घरून निघाल्या मात्र त्या थोड्या अंतरावर जात नाही तेवढ्यात त्यांच्या मागून दुचाकी वर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांचे जवळ थांबून त्यांना एवढ्या मध्ये फूलझेले राहतात का असे विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की मला माहिती नाही एवढे सांगताच लगेच दुचाकी वर मागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या छातीवर जोराने धक्का मारून त्यांच्या गळ्यामध्ये असलेले सोन्याचे गुफा मध्ये मध्ये गुंफलेले दीड तोळ्याचे एक लक्ष दहा हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र तोडून नेले घटना घडताच गोंधळल्याने त्यांनी आरडाओरड केली मात्र पहाटेची वेळ असल्याने कुणीही धावून आले नाही परंतु थोड्या अंतरावर असलेल्या एका महिलेने त्यांना एक्टिवा गाडीवर ही दोन मुले बराच वेळापासून फिरत असल्याचे सांगितले. दुचाकी वर आलेल्या दोन्ही चोरट्यांनी तोंडावर काळ्या रंगाचा स्कार्फ बांधलेला होता मागे बसलेल्या ज्या चोरट्याने मंगळसूत्र ओढले त्याने पांढऱ्या रंगाची टी-शर्ट घातल्याचे माहिती फिर्यादी कुमुद धोटे यांनी (Kalameshwar Police) पोलिसांना दिली. मंगळसूत्र ओढून चोरटे अति वेगाने दुचाकी घेऊन पसार झाल्याने दुचाकी चा नंबर त्या पाहू शकल्या नसल्याचेही त्या म्हणाल्या.

या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत सौ कुमुद धोटे यांनी (Kalameshwar Police) कळमेश्वर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्या विरुद्ध कळमेश्वर पोलीस स्टेशन मध्ये चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. कळमेश्वर पोलीस निरीक्षक काळबांडे व सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी सावनेर अनिल म्हस्के यांनी तत्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेतली व परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली. या अज्ञात चोरट्यांबाबत कुणास काही माहिती मिळाल्यास त्वरीत कळमेश्वर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी अनिल मस्के तसेच ठाणेदार काळबांडे यांनी केले आहे.

सहा महिन्यातील मंगळसूत्र चोरीची दुसरी घटना

सहा महिन्यापूर्वी कळमेश्वरातील हुडको कॉलनी येथून संध्याकाळी पाच वाजता कॉलनीतील सौ स्मिता काळबांडे या महिलेचे मंगळसूत्र अशाच प्रकारे अज्ञात चोरट्यांनी दुचाकी वर येऊन गळ्यातून तोडून नेले होते त्या घटनेचा तपास अद्याप पर्यंत लागायचाच असल्याने यातच ही दुसरी चोरीची घटना घडल्याने (Kalameshwar Police) कळमेश्वर पोलिसांच्या कर्तव्य दक्ष पणावर प्रश्नचिन्ह लागल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे. कळमेश्वर पोलिसांनी पेट्रोलिंग मध्ये वाढ करून चोरट्यांना शोधून काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article