Latur BJP: शिवाजीराव कव्हेकर काँग्रेसकडून सुपारी घेवून भाजपाला विस्‍कळीत करतात

2 hours ago 1

आ. कराड समर्थकांचा आरोप : पक्षातून निलंबित करण्याची प्रदेशाध्‍यक्षाकडे मागणी

लातूर (Latur BJP) : विधानसभा डोळयासमोर ठेवून वेळोवेळी काँग्रेसकडून सुपारी घेवून शिवाजीराव पाटील कव्‍हेकर (Latur BJP) भाजपाला विस्‍कळीत करण्‍याचे आणि कार्यकर्त्‍यात संभ्रम निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करतात. त्यांना भाजपातून तात्‍काळ निलंबित करावे, अशी मागणी रेणापूर तालुक्‍यातील कराड समर्थक भाजपा पदाधिकार्‍यांनी प्रदेशाध्‍यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

भाजपा नेते (Latur BJP) तथा किसान मोर्चा गोवा व गुजरात राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा 9 व 10 ऑक्टोबरला लातूर ग्रामीण मतदार संघात आठ गावांमध्ये संपर्क दौरा होत आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषद सदस्य रमेशअप्पा कराड समर्थकांनी हा पवित्रा घेतल्याने भाजपातील संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. प्रदेश अथवा जिल्हा भाजपाच्यावतीने कुठलाही पक्षाचा कार्यक्रम दिला नसताना भाजपा किसान मोर्चाचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर व त्यांचे पुत्र युवा मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी अजितसिंह पाटील कव्हेकर हे रेणापूर तालुक्यातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता भारतीय जनता पार्टी परिवर्तन संकल्प यात्रा काढत असून हा कार्यक्रम पक्षाचा नसून वैयक्तिक असल्याचा आरोप या पदाधिकार्‍यांनी केला आहे.

‘मी म्हणजेच भाजपा आणि भाजपा म्हणजेच मी’, अशा तोऱ्यात राहणाऱ्या कव्हेकर यांनी (Latur BJP) विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने भाजपाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न आणि कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोपही प्रदेशाध्यक्षांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.

या निवेदनावर भाजपा तालुकाध्‍यक्ष अॅड. दशरथ सरवदे, पंचायत राज सेलचे जिल्‍हा संयोजक नवनाथ भोसले, जिल्‍हा सरचिटणीस महेंद्र गोडभरले, ग्रामीण विधानसभा अध्‍यक्ष अनिल भिसे, निमंत्रीत सदस्‍य प्रदेश भाजपा सतिष अंबेकर, संगायो अध्‍यक्ष वसंत करमुडे, माजी नगराध्‍यक्ष अभिषेक आकन‍गिरे, माजी उपसभापती पं.स अनंत चव्‍हाण, सरपंच संघटना अध्‍यक्ष विजय गंभिरे, युवा मोर्चा तालुकाध्‍यक्ष अमर चव्‍हाण, महिला तालुकाध्‍यक्ष अनुसया फड, ओबीसी आघाडी तालुकाध्‍यक्ष विठ्ठल कसपटे, किसान आघाडी तालुकाध्‍यक्ष जयप्रकाश जटाळ, रेणापूर शहराध्‍यक्ष अच्‍युत कातळे, संतोष राठोड, गणेश तुरुप, सुरेंद्र गोडभरले, श्रीकृष्‍ण जाधव, श्रीकृष्‍ण पवार, दत्‍ता सरवदे, भाऊसाहेब गुळभिले, शिला आचार्य यांच्‍यासह अनेकांच्‍या सह्या आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article