Published on
:
21 Nov 2024, 10:24 am
Updated on
:
21 Nov 2024, 10:24 am
परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिल्ल्यातील चारही विधानसभा मतदारसंघांत यावेळी मतदारांचा अपूर्व उत्साह दिसून आला. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टका जवळपास ४ टक्क्यांनी वाढला असून जिल्हयात सरासरी ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याची ढोबळ माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. मतदानाचा हा वाढीव टक्का चुरशीच्या लढतीतील महायुत्ती वा महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये कोणासाठी फायदेशीर ठरेल, हे निकालाअंतीच स्पष्ट होऊ शकेल. मात्र लोकशाहीच्या या उत्सवात प्रशासनाच्या प्रयत्नांनी, जागरूक नागरिकांनी चजावलेल्या हकामुळे व कार्यकत्र्याच्या अथक प्रयत्नांमुळे टक्केवारीत भर पदली. ही बाब महत्त्वपूर्ण ठरली आहे.
सायंकाळी साडेसात वाजता निवडणूक विभागाने अंदाजे दिलेल्या आकडेवारीनुसार जिंतूरमध्ये ७० टके, परभणीत ६९ टक्के, गंगाखेडमध्ये ७३ तर पाथरीत ७२ टक्क्यांपर्यंत सरा सरी मतदान झाले. या टकेवारीत बदल होणार असाना तरी यापेक्षा ती वाद्रीवच असण्याची शक्यता असल्याने सरासरी ७० टक्क्यांहून अधिक मतदान होईल. २०१९ च्या निवडणुकीत जितमध्ये ७२.८८, परभणीत ६२.१७, गंगाखेडमध्ये ६८.८७ तर पाचरीत ६६.५८ टक्के मतदान झाले होते. एकुण सरासरी ६७.८३ टके राहिली होती. त्या तुलनेत ४ टक्क्यांची होत असलेली बाड महत्वपूर्ण ठरणार आहे. परभणीत महायुती व महाविकास आघाडीत झालेल्या थेट चुरशीच्या लढतीत मागील निवडणुकीच्या तुलनेत तब्बल ८ टक्क्यांची वाढ होत असल्याने ही चाढ कोणासाठी फायदेशीर ठरेल, पावर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क केले जात आहे अशीच स्थिती गंगाखेड व पायरीमध्ये देखील आहे या मतदारसंघातदेखील मतदानाचा टक्का ५ टक्क्यांनी वाढलेला आहे.
जिल्ल्यातील ४ मतदारसंघांत बुधवारी सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाल्यानंतर नागरिकांनी रांगा लावण्यास सुरुवात केली. ७ ते ९ वाजेपर्यंत जवळपास ८ टक्के मतदान झाले होते. ११ वाजेपर्यंत या मतदानात मोठी वाढ झाली १९ टक्क्यांपर्यंत ते पोचले. तर दुपारी १ वाजेपर्यंत ३३ टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाला काही प्रमाणात संथगती आली. दुपारी ३ वाजेपर्यंत जितूरमध्ये ४९.२. परभणीत ४४.९९, गंगाखेडमध्ये ५१.७५, पाथरीत ४८.८ टक्के मतदान झाले. तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिंतूरमध्ये ६३.५६, परभणीत ६०.६, गंगाखेडमध्ये ६४.८ तर पाथरीत ६२.८ टक्के मतदान झाले होते. सरासरी ६२.७३ टके मतदान सायंकाळी ५ वाजेपर्यंत झाल्याने नंतरच्या एका तासात प्रत्येकच मतदारसंघात काही केंद्रांचर रांगा लागलेल्या असल्याने टक्केवारीत भरीव वाढ झाली. ८ ते ९ टक्के मतदान या अखेरच्या तासात शाल्याचा प्रशासनाचा अंदाजा आहे.
मतदारांत जागरूकता
आतापर्यंतच्या विधानसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत असायची, मात्र यावेळी निवडणूक विभागाकडून राबविण्यात आलेली मतदार जागरूकता मोहीम, त्यासाठी राबविण्यात आलेले विविध सांस्कृतिक, प्रबोधनपर कार्यक्रम यामुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झाली. समाजमाध्यमांतून देखील मतदानाचे करण्यात आलेले आवाहन, निवडणूक आयोगाकडून वारंवार आलेले पोनकॉल्स यामुळे मतदारांनी उत्साहाने मतदान केले.
कार्यकर्त्यांची मेहनत
यावेळच्या निवडणूका मोठ्या चुरशीच्या राहिल्याने अस्तित्वाच्या व प्रतिष्ठेच्या लढाईत उमेदवारांनी बारकाईने नियोजन केले. त्याहीपेक्षा कार्यकत्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील मतदारांपर्यंत प्रत्यक्ष पोहचून त्यांना केंद्रापर्यंत आणण्यासातीही प्रयत्न केले, मतदारांना विविध प्रलोभने दिली गेली असली तरी जागरूक मतदारांनी आपल्या मनाप्रमाणे मतदाराचा हक बजावला. यामध्ये नवमतदारांसह ज्येष्ठ नागरिक, महिला यांनीही उत्साहाने आपला हक बजावला. प्रशासनाने दिव्यांगांसाठी व ८५ वर्षांवरील मतदारांसाठी गृहमतदानाचा पर्याय दिला असला तही ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आवारपणावर मात करीत मतदान केद्रापर्यंत पोचून हक्क बजावला. दिव्यांग मतदार देखील या उत्सवात हिरीरीने सहभागी झाले.
कोठा केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड
चारठाणा: येथून जवळ असलेल्या कोठा येथील प्रभाग ३९ या केंद्रावर दहा ते पंधरा मिनिटे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान थांबले होते. नंतर मशिन सुरू करण्यात आल्यानंतर ही प्रक्रिया सुरळीत पार पडली असून येथे एकुण १४६५ पैकी १०५२ जणांनी आपला हक्क बजावला.