Nagpur News : सहा ठिकाणी मतमोजणी, कुणाला धक्का, कुणाला लॉटरी!(file photo)
Published on
:
21 Nov 2024, 1:48 pm
Updated on
:
21 Nov 2024, 1:48 pm
नागपूर : बुधवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वाढलेल्या सरासरी 5 टक्के मतांनी नागपूर शहर व जिल्ह्यातील 12 जागांवर महायुती, महाविकास आघाडीत कुणाला धक्का , मत विभाजनात कुणाला लॉटरी लागणार याबाबत आज सकाळपासून वेगवेगळे अंदाज वर्तविले जात आहेत. उमेदवार,पदाधिकारी आणि त्यांचे पोल मॅनेजर्स आज रात्रीचा थकवा गेल्यावर दिवसभरात बूथ पातळीवर आडाखे मांडण्यात व्यस्त होते.
भाऊ आपल्या भागात तुम्हीच चालले, आपलाच जोर होता असा दिलासाही दिला जात होता. अर्थातच यावेळी मतदानानंतर दोनच दिवसात निकाल असल्याने उमेदवार देखील कार्यकर्त्यांच्या गोष्टी ऐकून मनोमन गदगद होताना दिसले. नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री डॉ नितीन राऊत, काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, हॅटट्रिक करणारे भाजपचे कृष्णा खोपडे,आमदार मोहन मते यांच्यासह प्रवीण दटके, बंटी शेळके, माजी आमदार सुधाकर कोहळे, गिरीश पांडव यांच्या भाग्याचा फैसला शनिवारी होणार आहे. शहरात सहा ठिकाणी मतमोजणी होणार आहे. काल मतदान प्रक्रियेत रात्री उशिरापर्यंत गुंतलेली पर्यायी प्रशासकीय व्यवस्था आज मतदानाच्या प्रक्रियेत गुंतल्याचे पाहायला मिळाले.(Maharashtra assembly polls)
शहरात कुठे कुठे मतमोजणी ?
पूर्व नागपूरची मतमोजणी -
ईश्वर देशमुख महाविद्यालय, क्रीडा चौक,पश्चिम नागपूर, एसएफएस कॉलेज, सेमीनेरी हिल्स, उत्तर नागपूर-सेंट उर्सला हायस्कूल, व्हिसीसमोर, सिव्हिल लाईन्स,दक्षिण नागपूर ,बचत भवन, हरदेव हॉटेल समोर, सीताबर्डी,मध्य नागपूर,जिल्हा परिषद स्कूल,काटोल रोड
दक्षिण पश्चिमची मतमोजणी -
सामुदायिक भवन,कॉमुनिटी हॉल, सेंट्रल रेल्वे, अजनी येथे होणार आहे.