ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पसरत आहेत. आतापर्यंत या बातमीवर बच्चन कुटुंबाकडून थेट काहीही सांगण्यात आलेले नाही. मात्र आता अमिताभ बच्चन यांनी या अफवांवर आपलं मौन सोडलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, ”मी कुटुंबाबद्दल फार कमी बोलतो, कारण हे माझे डोमेन आहे आणि मी माझी गोपनीयता राखतो. अफवा फक्त अफवा आहेत. या खोट्या अफवा आहेत, ज्यांची पुष्टी झालेली नाही”
अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे की, ”काय लिहीले जात आहे, किंवा ते कसे रिपोर्ट केले जात आहे, याची आधी खात्री करणे आवश्यक आहे. लोक प्रमाणीकरणाची मागणी करतात, जेणेकरून त्यांचा या व्यवसायावर विश्वास ठेवता येईल.”