Mala Ankola : माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईच्या मृत्यूचं गूढ वाढलं, नक्की काय घडलं?

2 hours ago 1

Former Cricketer Salil Ankola Mother: माजी भारतीय क्रिकेटर आणि अभिनेता सलील अंकोला यांच्या मातोश्री माला अंकोला या पुण्यातील घरात मृतावस्थेत सापडल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणाचा डेक्कन पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

 माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईच्या मृत्यूचं गूढ वाढलं, नक्की काय घडलं?

salil ankola and mala ankola

| Updated on: Oct 04, 2024 | 10:17 PM

माजी भारतीय क्रिकेटर सलील अंकोला यांच्या आईचा मृतदेह पुण्यातील त्यांच्या राहत्या घरात सापडला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी फ्लॅटमध्ये गेले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपासाला सुरुवात केली. पोलिसांना प्राथमिक तपासात सलील अंकोला यांच्या आईच्या मानेवर जखम असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे त्यांना कुणी संपवण्याचा प्रयत्न केला की त्यांनी स्वत:लाच संपवलं? की आणखी काही? याचा शोध घेतला जात आहे. तसेच ज्या घरात हा सर्व प्रकार घडला त्या घराला आतून कडी होती. त्यामुळे नक्की या मागे कुणाचा हात आहे का? याचा आता शोध सुरु आहे.

माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचं माला अशोक अंकोला असं होतं. त्या 77 वर्षांच्या होत्या. त्या पुण्यातील प्रभात डेक्कन या भागातील ‘आदी’ या इमारतीत राहायच्या. घरकाम करणारी महिला घरी आली. तेव्हा घर बंद आढळलं. त्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलीस शुक्रवारी संध्याकाळी माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले. घर आतून बंद असल्याने नातेवाईकांकडून चावी घेतली आणि दरवाजा उघडण्यात आला. दार उघडल्यानंतर माला अंकोला या मृतावस्थेत सापडला. तसेच त्यांच्या गळ्यावर जखमही होती. पोलिसांनी तात्काळ माला यांना रुग्णालयात घेऊन गेले, मात्र तोवर त्यांचा मृत्यू झाला होता. पुण्यातील डेक्कन पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article