Market Update: पुण्यात फळभाज्यांचे दर ‘जैसे थे’; बाजारात 90 ते 100 ट्रकमधून शेतमाल दाखल

2 hours ago 1

परराज्यातून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून हिरवी मिरची 8 ते 10 टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, कर्नाटक येथून पावटा 2 टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा 3 ते 4 टेम्पो, इंदौर येथून 6 ते 7 टेम्पो गाजर, कर्नाटक आणि गुजरात येथून घेवडा 2 ते 3 टेम्पो, गुजरात येथून 3 टेम्पो भुईमुग शेंग, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे 5 ते 6 टेम्पो इतकी आवक झाली होती. तर स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 400 ते 500 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, टोमॅटो दहा ते अकरा हजार पेटी, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, कोबी 3 ते 4 टेम्पो, सिमला मिरची 7 ते 8 टेम्पो, भुईमुग शेंग 40 ते 50 गोणी, मटार पुरंदर, पारनेर, वाई आणि सातारा भागातून 40 ते 50 गोणी, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांदा सुमारे 100 ट्रक, इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 40 ट्रक आवक झाली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article