Published on
:
18 Nov 2024, 12:23 pm
Updated on
:
18 Nov 2024, 12:23 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क - साऊथ सिनेमा सुपरस्टार्स नयनतारा आणि धनुष यांच्यातील वाद वाढला आहे. हा वाद नयनताराची नेटफ्लिक्स डॉक्युमेंट्री "नयनतारा : बियॉन्ड द फेयरी टेल" मध्ये ३ सेकंदाचा फुटेज वापरल्याने वाढला आहे. धनुषने या फुटेजवर आक्षेप घेत १० कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. (Nayanthara Dhanush Controversy )
नयनताराने हे "खूपच आचंबित असल्याचे म्हटले आहे. तिने इन्स्टाग्रामवर लिहिलंय की, हा व्हिडिओ आधीपासून सार्वजनिक आहे, मग नंतर तो हटवण्यात आला आहे. ही डॉक्युमेंट्री १८ नोव्हेंबर रोजी रिलीज होईल. (Nayanthara Dhanush Controversy )
धनुषने कायदेशीर नोटीसमध्ये काय म्हटलं?
धनुषच्या वकिलाने म्हटले की, माझे क्लाईंट प्रोड्यूसर आहे आणि त्यांना माहितीये की, चित्रपटाच्या प्रोडक्शनसाठी एक-एक पैसा कुठे खर्च झाला आहे. धनुषने म्हटले की, कोणत्याही व्यक्तीला पडद्यामागील फोटो चित्रपटात वापरण्यासाठी कमीशन दिलेले नाही. आपण सांगण्यात आलेले स्टेटमेंट निराधार आहेत. आपणास यासाठी ठोस पुरावे सादर करावे लागतील.
"नयनतारा : बियॉन्ड द फेयरी टेल" डॉक्युमेंट्रीमधील बीटीएस सीनने झाला वाद
धनुषच्या वकिलांचे म्हणणे आहे की, चित्रपटात काही बीटीएस मोमेंट दाखवण्यात आले आहेत. त्याचा निर्माता धनुष आहे न की हे रेकॉर्ड करणारा व्यक्ती. त्यांनी 'नानुम राउडी धान' चित्रपटातील काही सीन नयनताराच्या डॉक्युमेंट्रीतून हटवण्यासाठी इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, २४ तासांच्या आत अंमलबजावणी न केल्यावर धनुषला कायदेशीर कार्यवाही सुरू करणे भाग पडेल. नयनतारा आणि नेटफ्लिक्स इंडिया दोन्हींविरोधात १० कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.