विधानसभा निवडणूकीत एका उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सातत्याने पोर्शे अपघात प्रकरणाचा राजकिय फायद्यासाठी वापर करणे म्हणजेच या अपघात मृत्युमुखी पडलेल्यांच्या टाळू वरचे लोणी खाण्याचा घाणेरडा प्रकार आहे, असे प्रत्युत्तर आमदार सुनिल टिंगरे यांनी दिले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेला आमदार टिंगरे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले, पोर्शे अपघात घटनेच्या दिवशी नक्की काय घडले, हे मी पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे सांगितले होते. या चौकशीतही माझा कुठेही सहभाग नसल्याचे निष्पण्ण झाले आहे. असे असताना केवळ राजकारण म्हणून मला अडकविण्यासाठी सातत्याने या अपघाताच्या घटनेचे राजकारण केले जात आहे. अंधारे यांना मृत्यु पडलेल्या तरुण-तरुणी विषयी ममत्व नाही आणि काहीच देणे घेणे नाही. ही घटना घडली त्यावेळेस अंधारेंनी माझे कधीच नाव घेतले नव्हते. आता त्यांच्या उमेदवारांचा पराभव दिसू लागल्याने त्यांनी शेवटीच्या दिवशी सुद्धा धावत-पळत येऊन पुन्हा तोच मुद्दा उकरून काढला. मात्र वडगाव शेरीची जनता सुज्ञ आहे, तुम्ही अपघाताच्या घटनेचे जे घाणेरडे राजकारण करीत आहात, ते न समजण्या इतपत खुळी नाही, असेही आमदार टिंगरे यांनी म्हटले आहे. सुषमा ताईंना एवढाच कळवळा असेल तर ज्यांनी आपल्या सुनेचा छळ केला, तिला मानसिक त्रास दिला, ज्या माई माउलीला मुख्यमंत्र्याच्या सभेत उभे राहून न्याय मागावा लागला, तिला न्याय देण्यासाठी आवाज उठवावा. उगाच राजकारण म्हणून उचलली जीभ टाळयाला लावू नये, असे आमदार टिंगरे म्हणले आहे. हे ही वाचा... बारामतीतील अखेरच्या सभेत अजित पवार भावूक:आईपुढे म्हणाले - निवडणुकीत साथ द्या, प्रत्येकाला हवाहवासा वाटेल असा तालुका करेन बारामती विधानसभा मंतदारसंघाच्या निवडणुकीच्या सांगता सभेत अजित पवारांनी भाषण करताना अनेक विषयांना हात घातला आहे. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आहे. तसेच बारामतीकरांशी संवाद साधतान अजित पवार यावेळी भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्याने मी बारामतीकरांच्या सदिच्छा घ्यायला आलो आहे. तुम्ही मला 7 वेळा निवडून दिले आता आठव्यांदा निवडून द्या, असे आवाहन अजित पवारांनी केले आहे. पूर्ण बातमी वाचा... बारामतीसाठी आम्ही 50 वर्षे काम केले:युगेंद्र आमच्या पेक्षाही जोमाने काम करेल, शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या हायप्रोफाईल बारामतीत युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी बारामतीतील लेंडीपट्टा मैदानावर शरद पवार यांची सभा पार पडली. बारामतीचा चेहरा बदलण्यासाठी आम्ही 50 वर्षे काम केले, आमच्याही पेक्षा अधिक जोमाने काम करण्याची हिंमत आणि कष्ट करण्याची तयारी युगेंद्र पवारमध्ये आहे, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदींना बाबासाहेब आंबडेकरांनी लिहिलेल्या घटनेमध्ये सुधार करण्यासाठी 400 खासदारांची आवश्यकता होती, अशी टीका शरद पवार यांनी केली. पूर्ण बातमी वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)