मतांसाठी महाराष्ट्राच्या भावनांशी खेळणाऱ्या महाराष्ट्रद्वेष्ट्यांवर कारवाई होणार का? आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल

2 hours ago 1

महाराष्ट्रात सोमवारी विधानसभआ निवडणुकांचा प्रचार थंडावला आहे. या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे आणि एक है सेफ है असे नारे देत भाजपकडून समाजात फूट पाडत द्वेष पसरवण्याचा हेतू दिसून आला. आता निवडणुकीच्या पार्श्भूमीवर जनतेते संभ्रम निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रद्वेष्ट्यांकडून फेक न्यूज पसरवण्यात येत आहे. फेक न्यूज पसरवणाऱ्या महाराष्ट्र द्वेष्ट्यांवर निवडणूक आयोग किंवा मुंबई पोलीस करावाई करणार का, असा संतप्त सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, फूट पाडा आणि सत्ता मिळवा, रेटून खोटे बोला आणि सत्ता मिळवा, या भाजपच्या विकृत मानसीकतेचे दर्शन घडत आहे. या पोस्टसह त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे. त्यात असे म्हटले आहे की, वफ्फ बोर्डचा मुंबईतील सिद्धाविनायक मंदिरावर दावा आणि त्यावर फेक असे स्पष्ट लिहीले आहे. राज्यात 20 तारखेला मतदान होत असताना त्याआधी अशाप्रकारच्या खोट्या अफवा, बातम्या परसवण्यात येत आहे. आता त्यावर करावाई करण्याची गरज आहे. निवडणूक आयोग अशा महाराष्ट्रद्वेष्ट्यांवर कारवाई करत त्यांना अटक करणार का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

The absolutely disgusting mentality of the bjp’s ecosystem. Divide and rule. Lie and try to win.

Will the @ECISVEEP and @MumbaiPolice ever act and arrest such disgusting hate creators and Maharashtra haters?

Don’t play with our sentiments and emotions in Maharashtra for your… pic.twitter.com/bnYdFixXXN

— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 18, 2024

अशा प्रकारे अफवा आणि फेक न्यूज पसरवणारे महाराष्ट्रद्वेष्ट्ये आहेत. सत्ता आणि मतं मिळवण्यासाठी महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या भावनांशी खेळू नका, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article