2019 मध्ये जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला:मग खरे गद्दार कोण? CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका, राहुल गांधींवरही साधला निशाणा

1 hour ago 1
आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. 2019 मध्ये जनतेने युतीला कौल दिल्यानंतरही ते आघाडीसोबत गेले. महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला, मग खरे गद्दार कोण? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला. राहुल गांधींनी महाराष्ट्रावर दरोडा टाकण्यासाठी तिजोरी आणली होती, अशी टीकाही एकनाथ शिंदे यांनी केली. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला एकनाथ शिंदे म्हणाले, '2019 विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजप एकत्र लढले. लोकांनी युतीला भरभरून मते देत बहुमत दिले. मात्र, त्या दिवशी त्यांनी स्टेटमेंट केले की, आमच्याशिवाय सरकार बनत नाही, आमच्यासाठी सर्व दरवाजे मोकळे आहेत. म्हणजे त्यांचे ठरले होते. ते आघाडीसोबत गेले आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या, भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. मग आता खरे गद्दार कोण? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केला. तोडो-फोडो काही करा. मला जेलमध्ये टाका. मी काय ऐरागैरा नाही. त्यांनी एकनाथ शिंदेला हलक्यात घेतले. शिंदेंनी तुम्हाला इतके टाइट केले की, खुर्चीच गायब झाली, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. राहुल गांधींनी धारावीचे सत्य जाणून घ्यावे पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, 'राहुल गांधी यांनी एक तिजोरी आणली. मला वाटलं की महाराष्ट्राला काही देतील. खटाखट देणार बोलले होते. पण ते महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घालण्यासाठी आले. त्यांनी ती तिजोरी मातोश्रीवरून तरी मागवायची असती. त्यात काहीतरी निघाले असते, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. राहुल गांधींकडून ही अपेक्षा नव्हती. जनतेला न्याय देण्यासाठी राहुल गांधींनी व्यवस्थित माहिती घ्यावी. राहुल गांधींनी धारावीचे सत्य जाणून घ्यावे. गरीब जनता आहे. तुम्हाला आशीर्वाद मिळतील, असे आवाहन मी राहुल यांना पुन्हा एकदा करतो. ते बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट बोलतात का? त्यांची पण जीभ कचरतेय, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला. बॅग चेकिंगवरून उद्धव ठाकरेंवर टीका एकनाथ शिंदे बॅग चेकिंगवर देखील भाष्य केले. 'निवडणुकीदरम्यान बॅगांची चेकिंग केली जाते. ते रुटिन आहे. माझी पण बॅग चेक केली. मुख्यमंत्री राहिलेला माणूस व्हिडिओ, फोटो काढतो. विचारतात, माझे कपडे आहेत. युरिन पॉट पण आहे. त्या बॅगमध्ये काही नाही. जाणाऱ्या-येणाऱ्यांना तपासा. त्यांना कंटेनर लागतात. बॅगा नाही, असे म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. मुंबादेवीत एकनाथ शिंदेंची सांगता सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या मुंबादेवीतील उमेदवार शायना एनसी यांच्यासाठी शेवटची सभा घेतली. शायना एनसी या मूळच्या भाजपच्या आहेत, पण, जागा वाटपात मुंबादेवी हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला. त्यानंतर शायना एनसी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासाठी सांगता सभा घेतली. हे ही वाचा... विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा संपला:आता भेटीगाठी व गुप्त बैठकांवर जोर, ECची नजर; बुधवारी मतदान, शनिवारी निकाल मागील 4 आठवड्यांपासून राज्यभर सुरू असणारा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा अखेर सोमवारी सायंकाळी 6 वाजता खाली बसला. आता राजकीय पक्षांकडून भेटीगाठी व गुप्त बैठकांद्वारे मतदारांपर्यंत प्रयत्न सुरू होणार आहे. यात मतदारांना पैसे व भेटवस्तू वाटण्याचेही प्रकार होण्याची शक्यता आहे. पण निवडणूक आयोगाने असे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांच्या माध्यमातून करडी नजर ठेवली आहे. दरम्यान, आता प्रचारसभा, रोड शो, पदयात्रा, बाईक रॅली आदींचा दणदणाट शांत झाला असून, अवघ्या महाराष्ट्राला बुधवारी होणाऱ्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. सविस्तर वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article