पुसद (Pusad Assembly Elections) : पुसद विधानसभा मतदारसंघ -81 करिता येत्या 20 नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक पार पडणार असून त्या दिवशी मतदान प्रक्रिया होणार आहे. पुसद विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण तीन लाख 18 हजार रुपये मतदार असून त्यापैकी तीस हजाराच्या वर मतदार हे ऊस तोडीसह वीटभट्ट्यांवर गेलेले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी लोकशाहीचा उत्सव मतदान रुपी साजरा होणार असून (Pusad Assembly Elections) मतदारांची जनजागृती करण्यासाठी प्रशासनासह सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे.
यांच्यासह सर्व (Pusad Assembly Elections) मतदारांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता महसूल प्रशासनातर्फे शहरामध्ये 18 नोव्हेंबर रोजी स्वाक्षरी मोहीम तसेच महा रॅली काढण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महादेवराव जोरवर यांच्या मार्गदर्शनात पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी आवटे मॅडम, शिक्षण अधिकारी अमित बोजेवार यांच्यासह नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत वायकोस, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कु. प्रिया पुजारी, अशोक राठोड भूमि अभिलेख उपाधीक्षक पुसद, पंचायत समितीची प्र.गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, सहाय्यक गट विकास अधिकारी संजय राठोड, निवडणूक विभागाचे लिपिक सत्यम राठोड, देवानंद राठोड, गौण खनिज विभागाचे लिपिक अनिल वैद्य, राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप कोल्हेवाड, पाईकराव, थोरात मॅडम, राठोड मॅडम, जय राठोड, लोखंडे, मोहटे, बावणे, सुरोशे, नायब तहसीलदार विवेक इंगोले, गजानन कदम, फटाले मॅडम अन्न व पुरवठा निरीक्षक, काणेड यांच्यासह इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.