पुसद (Pusad Assembly Election) : येत्या 20 नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या माध्यमातून मतदान रुपी लोकशाहीचा उत्सव साजरा होत असून, यामध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून या उत्सवामध्ये सहभागी व्हावे व मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त प्रमाणात वाढावी याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी आशिष बीजवल व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार माधवराव जोरवर यांच्या मार्गदर्शनात पुसद शहरांमध्ये 18 नोव्हेंबर च्या पहाटे सात वाजता दरम्यान जनजागृतीची महारॅली काढण्यात आली होती.
या महा रॅलीच्या शेवट येथील यशवंत रंग मंदिरावरील प्रांगणात झाला. याप्रसंगी (Pusad Assembly Election) निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांनी मतदारांना या लोकशाहीच्या उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करून विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची टक्केवारी जास्तीत जास्त कशी वाढेल याकडे प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितलं.