डोंबिवलीतील गोळवली गावात आढळला ८ फुटाचा अजगर आढळला.
Published on
:
18 Nov 2024, 2:48 pm
Updated on
:
18 Nov 2024, 2:48 pm
डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या गोळवली गावात राहणारे रूपेश म्हात्रे यांच्या घराजवळ सोमवारी (दि.१८) दुपारच्या सुमारास अजगर आढळून आला. म्हात्रे यांनी त्याची माहिती दिल्यानंतर सर्पमित्र बाबाजी पाडेकर यांनी घटनास्थळी पोहोचून अजगरला सुरक्षित पद्धतीने पकडून पिशवीत बंद केले. यावेळी उपस्थित रहिवाशांना पाडेकर यांनी सापाबद्दल असलेले गैरसमज दूर केले.
शहरीकरणामुळे सापांचे आधीवस नष्ट होत आहेत. जंगले, गवताळ प्रदेश, पाणथळ जागा, नद्या, इत्यादी सर्व प्रकारच्या वन्यजीव अधिवासांवर मानवी अतिक्रमण होत आहे. भक्ष्याच्या शोधत वन्यजीव मानवी वस्तीत शिरकाव करताना दिसत आहेत. ८ फूट लांबीचा अजगर सर्पमित्र बाबाजी पाडेकर यांनी पुर्वेश कोरी, सुभाष पांडियन, भूषण रानडे आणि राजू केन यांच्या मदतीने पकडला. ही माहिती कल्याण वन परिक्षेत्रचे वनाधिकारी राजू शिंदे यांना देण्यात आली. या अजगराला वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याचे सर्पमित्र बाबाजी पाडेकर यांनी सांगितले.