सावली तालुक्यातील व्याहाड (बूज), अंतरगाव, पाथरी येथे प्रचार सभा
देशोन्नती वृत्तसंकलन
चंद्रपूर (MLA Vijay Vadettiwar) : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार महंगाई पे वार, म्हणून मोदी सरकारने खोटे बोलून सत्तेवर येताच देशातील मोजक्या उद्योगपतींचे हित जोपासत प्रचंड महागाई वाढविली. तर राज्यात फडणवीस व त्यानंतरच्या घटनाबाह्य खोके सरकारने राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, नोकरदार यांचा भ्रमनिरास केला. भाजप काय आपल्या खिशातून राज्यातील महिलांना निधी देत आहे का? असा प्रश्न उपस्थित करत मी तुमच्या सदैव सुख दुःखाचा साथी आहे. सख्खा जरी नसलो तरी पक्का भाऊ आहे. म्हणूनच महायुती सरकारला सत्तेतून हाकलून लावा, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते, तथा (Brahapuri Constituency) ब्रम्हपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार (MLA Vijay Vadettiwar) यांनी केले.
आयोजित कार्यक्रमास अॅड. राम मेश्राम, संदीप गड्डमवार, दिनेश चिटनुरवार, रोहित बोम्मावार, नितिन गोहने, राजेश सिद्धम, विजय मुत्यालवार, गोपाल रायपूरे, विजय कोरेवार निखिल सुरमवार, उषा भोयर, पुरुषोत्तम चूधरी, किशोर कारडे संदीप पुण्यापवार, तथा ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष, काँग्रेस पदाधिकारी व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते. पुढे बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (MLA Vijay Vadettiwar)म्हणाले की, देशातील व राज्यातील हे महापापी सरकार उद्योगपतीचे कर्ज माफ करते पण शेतकऱ्यांना मात्र देशोधडीला लावले आहे.
ब्रहापुरी मतदारसंघातील (Brahapuri Constituency) शेतकऱ्यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पाचे ५ हजार कोटीचे काम आघाडी सरकार असताना सुरू केले. या प्रकल्पाला निधी मिळावा म्हणून झगडावे लागले पण यामुळे संपूर्ण क्षेत्रातील ८० टक्के शेती ओलिताखाली आली आहे. तसेच मतदारसंघातील रस्ते, घरकुल योजना, शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांकरिता वस्तीगृहे, वाचनालय, गावागावात सामाजिक सभागृहे, शुद्ध पेयजल योजना, क्रीडांगणाचा विकास, आरोग्य व प्रशासकीय सेवेसाठी प्रशस्त इमारती यासाठी आमदार म्हणून आपल्या कामाचा लेखाजोगा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडला. ब्रह्मपुरी मध्ये मी लोकप्रतिनिधी नाही तर तुमचा भाऊ म्हणून काम करतो, भगिनींच्या पाठीशी वेळोवेळी उभा राहील अशी ग्वाही (MLA Vijay Vadettiwar) त्यांनी यावेळी दिली.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप गड्डमवार, माजी सभापती दिनेश चिटनूरवार यांनी विरोधी पक्षनेते तथा (Brahapuri Constituency) ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विकास कामांचा लेखाजोखा दिला. व आपल्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे नाव राज्याच्या प्रगतशील क्षेत्र यादीत अग्रस्थानी समाविष्ट करण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (MLA Vijay Vadettiwar) यांना पुन्हा एकदा निवडून द्या असे आव्हान त्यांनी केले. आयोजित मेळाव्यास परिसरातील बहुसंख्येने गहिला भगिनी व नागरिक उपस्थित होते.