Published on
:
26 Nov 2024, 6:26 am
Updated on
:
26 Nov 2024, 6:26 am
पुढारी ऑनलाईन डेस्क - ए आर रहमान यांच्या घटस्फोटाच्या विषयानंतर तिचे नाव संगीतकार ए आर रहमान यांच्याशी जोडलं गेलं. या प्रकरणी आधीच रहमान यांच्या पत्नीने स्पष्टीकरण दिले आहे आणि आता मोहिनी डेने देखील आपली बाजू सर्वांसमोर मांडली आहे. सोबतचं तिने सांगितले आहे की ए आर रहमान यांच्याशी तिचं नातं कसं आहे.
ए आर रहमान यांनी २९ वर्षांनंतर त्यांची पत्नी सायरा बानोशी वेगळे होण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ए आर रहमान यांच्या म्युझिक टीममधील सदस्य आणि बेसिस्ट मोहिनी डेने देखील आपल्या पतीसोबत माते संपवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अनेकांनी मोहिनीचे नाव रहमान यांच्याशी जोडले. सोशल मीडियावर ए आर रहमान आणि मोहिनी डे यांच्यातील लिंक-अपचे वृत्त पसरले. दरम्यान, ए आर रहमान यांची पत्नी सायरा बानो यांनी स्पष्टीकरण दिलं लगेच दोन दिवसांनी मोहिनी हिची प्रतिक्रिया देखील समोर आलीय.
अखेर मोहिनी डेने सोडलं मौन
मोहिनीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतचं तिने एक कॅप्शन देखील लिहिली आहे. व्हिडिओमध्ये तिने सोशल मीडियावरील सर्व अफवा खोट्या असल्याचे सांगितले. तिने आपल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं की, तिच्यामध्ये आणि ए आर रहमान यांच्यात एक टीम मेट आणि मेंटर शिवाय दुसरे कोणतेही नाते नाही. तिने हे देखील स्पष्ट केलं की, ती ए आर रहमान यांच्यासोबत अनेक वर्षांपासून जोडली गेलेली आहे आणि ती वडिलांप्रमाणे समजते. मोहिनीने व्हिडिओ सोबतच एका कॅप्शनमध्ये देखील आपल्या मतातील गोष्ट शेअर केली आहे तसेच मीडियाला अफवा पसरवू नये अशी विनंती करत गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहनही केले आहे.