फडणवीस मुख्यमंत्री होणार भाजपने शिंदेना दिला संदेश:एकनाथ शिंदेंनी केंद्रात योगदान दिल पाहिजे- रामदास आठवले
2 hours ago
1
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असा संदेश भाजपने एकनाथ शिंदेना दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत आले पाहिजे. त्यांनी दिल्लीत योगदान दिल पाहिजे, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. दरम्यान रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की, बिहारमधील मुख्यमंत्रीपदासारखी गोष्ट महाराष्ट्रात होऊ शकत नाही. राज्यात भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री व्हायला हवे. शिंदेंनी दोन पाऊल मागे सरकावे रामदास आठवले म्हणाले की, राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली आहे. त्यांनी राज्यात त्यांनी उपमुख्यमंत्रीपद घेत राहणार असतील तर ठीक आहे, नाहीतर त्यांनी केंद्रात एखादे मंत्रिपद घ्यावे, असा एक पर्याय त्यांचा समोर पर्याय आहे. त्यांनी दोन पाऊल मागे सरकत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे. मुख्यमंत्री पदावरून शिंदे-फडणवीसांमध्ये दुरावा? मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी दोघांमध्ये समिट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासाठी राजभवनात आले असता अजित पवार यांनी टायमिंग साधत देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसवले. एकनाथ शिंदे राजीनामा देण्यासाठी राजभवनात येण्याआधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तेथे पोहोचले होते. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघांमध्ये एकत्र बसून चर्चा सुरू होती. दरम्यान, एकनाथ शिंदे राजभवनात दाखल झाले. तिघे एकत्र बसत असताना देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या बाजूला बसत होते. पण अजित पवार आपल्या जागेवरून उठून बाजूला झाले. अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसवत दोघांची दिलजमाई करण्याचा प्रयत्न केला. वाचा सविस्तर
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री का होणार? 5 कारणे महाराष्ट्रातील भाजप प्रणित महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. यासंबंधी एकनाथ शिंदे काहीसे नाराज असल्याची चर्चा आहे. पण अजित पवारांच्या पाठिंब्यामुळे सध्या तरी भाजपचा मुख्यमंत्री करण्यात कोणतीही अडचण दिसत नाही. पण भाजपसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणे सोपी गोष्ट नव्हती. आजवर त्यांचे ब्राह्मण असणे हे त्यांचे मुख्यमंत्री होण्याच्या विरोधात होते. याशिवाय महाराष्ट्र भाजपमध्येही त्यांच्याविषयी बरेच मतभेद होते. वाचा सविस्तर
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)