देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे:भाजप नेत्यांकडून सुपारी हनुमानाची महाआरती, संकट दूर करण्याचे घातले साकडे
2 hours ago
1
राज्यात मुख्यमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. भाजपच्या 132 जागा आल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मुख्यमंत्री मिळवण्याबाबतचा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी संभाजीनगर शहरातील सुपारी हनुमान येथे भाजपकडून महाआरती करण्यात आली. संकट मोचक असणाऱ्या हनुमानाची आरती करून फडणवीस यांच्या समोरील संकट दूर करण्यात यावे, असे साकडे यावेळी घालण्यात आल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली आहे. भाजपमध्ये फडणवीस यांना मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे.त्यासाठी विविध ठिकाणी भाजपकडून महाआरती देखील करण्यात येत आहे. शहरातल्या सुपारी हनुमान मंदिर भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने महाआरती करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात शहरातील भाजप पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी यावेळी मारुतीला साकडे घालण्यात आले. यावेळी लाडक्या बहिणींची देखील उपस्थिती होती. लाडक्या बहिणींचा भाऊ देवा भाऊ आहे यावेळी शिरीष बोराळकर म्हणाले की, आज महाराष्ट्रात युतीला जे यश मिळाले त्याचे श्रेय फडणवीस यांना जाते. लाडकी बहिणींचा भाऊ देवा भाऊ आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे, अशी आमची मागणी इच्छा आहे. त्यामुळे आज शहरातील मारुती मंदीरात आम्ही महाआरती केली आहे. सोबतच मारुतीला साकडे घातले आहे की, फडणवीस मुख्यमंत्री व्हावे. असे झाल्यास याच मंदिरात आम्ही मोठी पूजा करू, असेही ते म्हणाले. हे ही वाचा... देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री का होणार? 5 कारणे:BJP कडे तुल्यबळ नेत्याचा पर्याय नाही, फडणवीस यांच्या कोणत्या गोष्टी ठरल्या वरचढ? महाराष्ट्रातील भाजप प्रणित महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. यासंबंधी एकनाथ शिंदे काहीसे नाराज असल्याची चर्चा आहे. पण अजित पवारांच्या पाठिंब्यामुळे सध्या तरी भाजपचा मुख्यमंत्री करण्यात कोणतीही अडचण दिसत नाही. पण भाजपसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणे सोपी गोष्ट नव्हती. आजवर त्यांचे ब्राह्मण असणे हे त्यांचे मुख्यमंत्री होण्याच्या विरोधात होते. याशिवाय महाराष्ट्र भाजपमध्येही त्यांच्याविषयी बरेच मतभेद होते. सविस्तर वाचा... मुख्यमंत्री पदावरून शिंदे-फडणवीसांमध्ये दुरावा?:अजित पवारांचा राजभवनात टायमिंग साधत दोघांमध्ये दिलजमाईचा प्रयत्न मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी दोघांमध्ये समिट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासाठी राजभवनात आले असता अजित पवार यांनी टायमिंग साधत देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसवले. सविस्तर वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)