38 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा 2024:एक डिसेंबर रोजी होणार असल्याची अभय छाजेड यांची माहिती
2 hours ago
1
यंदाची ३८ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २०२४, पुढील रविवारी दिनांक १ डिसेंबर रोजी पहाटे सुरू होणार आहे. यात भाग घेणाऱ्या इंटरनॅशनल तसेच भारतीय धावपटुंसाठी आणि पुणेकर प्रेक्षकांसाठी ही मॅरेथॉन एक अविस्मरणीय अनुभव देण्याचे वचन घेऊन येत आहे. यावर्षी या स्पर्धेचे ३८ वे वर्ष आहे. करोना सारखे एक दोन अपवाद वगळता , सन १९८३ पासून ही स्पर्धा सातत्याने पुणे आंतर राष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्ट तर्फे दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित केली जाते. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन (एम्स)समितीने त्यांच्या वार्षिक कॅलेंडर मध्ये सदर मॅरेथॉन चा कायम स्वरुपी समावेश केला असून भारतातील सर्वात जुनी मॅरेथॉन असा "फ्लॅग शिप" चा मान हिला मिळाला आहे अशी माहिती आयोजक अभय छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली. छाजेड म्हणाले,४२.१९५ किमी ची पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा पहाटे ३ वाजता सणस मैदानावरून सुरू होईल, त्यानंतर पहाटे ३.३० वाजता हाफ मॅरेथॉन २१.०९७५ किमी, सकाळी ६.३० वा. १० किमी तसेच ७ वा. ५ किमी ची शर्यत ( सर्व रेसेस पुरुष आणि महिला गट) आणि सकाळी ७.१५ वा. ३ किमी ची व्हील चेअर अशा क्रमाने रेसेस सोडण्यात येतील.स्पर्धेत सहभगी होणाऱ्या खेळाडूंसाठी सुरक्षितता तसेच कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. वैद्यकीय व्यवस्था समिती वैद्यकीय व्यवस्था समितीची स्थापना करण्यात आली असून डॉ. राजेंद्र जगताप यांचे अध्यक्ष आहेत. या समितीत १५० डॉक्टर्स आणि २५० नर्सिंग, फिजीओ स्टाफ , 108 नंबर च्या १० ॲम्ब्युलन्स , सणस मैदानात १५ बेडचे तात्पुरते हॉस्पिटल,याची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण मार्गावर हे डॉक्टर्स , 108 ॲम्ब्युलन्स एम. इ.एम.एस. नर्सिंग स्टाफ खेळाडूंची काळजी घेतील.सणस मैदान आणि संपूर्ण मार्गावर प्रत्येक किमी वर पिण्याचे पाणी, एक डॉक्टर आणि ३ नर्सिंग स्टाफ , १ ॲम्ब्युलन्स यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक २.५ किमी वर , फिडींग बूथ ,एनर्जी ड्रिंक, फळे, ,स्पंजिंग (वॉटर बूथ )आणि इतर सर्व व्यवस्था " वर्ल्ड ॲथलेटिक्स" आणि भारतीय ॲथलेटिक्स महासंघ ,नवी दिल्ली यांचे नियमां नुसार आणि अटिं नुसार करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण मार्गावर इलेक्ट्रॉनिक्स टायमिंग सिस्टीम बसवण्यात येईल. प्रत्येक धावपटूच्या स्पर्धा क्रमांकाच्या मागील बाजूस लावण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स चीपशी ती जोडली जाईल आणि सर्व खेळाडूंना त्यांचे वैयकतिक टायमिंग दिले जाईल.पुणे महानगर पालिके तर्फे विजेत्यांना दरवर्षी प्रमाणे रोख पारितोषिके देण्यात येतील.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)