श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडाच्या घाट रस्त्यावरील वाहतूक २५ नोव्हेंबर ते दि. ९ जानेवारी २०२५ या कालावधीत सकाळी ६ ते दुपारी ११.३० या वेळेत बंद राहील.Pudhari
Published on
:
26 Nov 2024, 8:30 am
Updated on
:
26 Nov 2024, 8:30 am
सप्तशृंगी गड : श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडाच्या घाट रस्त्यावरील वाहतूक सुरू असलेल्या दरड प्रतिबंधक उपाय योजनेच्या कामासाठी २५ नोव्हेंबर ते दि. ९ जानेवारी २०२५ या कालावधीत सकाळी ६ ते दुपारी ११.३० या वेळेत बंद करण्यात येणार असल्याचा आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अकुनुरी नरेश यांनी निर्गमीत केला आहे.
सप्तश्रृंगीगड ते नांदुरी या रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाययोजना जाळी बसविणे व बॅरिअर बसविणे हे काम प्रगतीपथावर आहे. या रस्त्यावर सैल खडक दरड काढण्याचे काम सुरू असल्यामुळे रस्त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने व नागरिकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तारीख २५/११/२०२४ ते ९/०१/२०२५ या कालावधीत सकाळी ६ ते दुपारी ११.३० या वेळेत वाहतूक बंद करणे आवश्यक आहे. सदर रस्त्यावर पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने ही कामे या दिवशी गडावरील वाहतूक बंद राहणार आहे.
या तारखेला राहणार वाहतुक बंद -
२५/११/२०२४, २७/११/२०२४,
२८/११/२०२४, ०२/१२/२०२४,
०४/१२/२०२४, ०५/१२/२०२४,
०९/१२/२०२४, ११/१२/२०२४,
१२/१२/२०२४, १६/१२/२०२४,
१८/१२/२०२४, १९/१२/२०२४,
२३/१२/२०२४, ०६/०१/२०२५,
०८/०१/२०२५, ०९/०१/२०२५
२४ डिसेंबर ते ५ जानेवारीदरम्यान वाहतूक सुरू राहणार...
गडावर भाविकांच्या गर्दीचे असणारे दिवस अर्थात मंगळवार, शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशी पूर्ण दिवस रस्ता खुला ठेवण्यात येणार आहे. नाताळाची सुट्टी व नववर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंगी गडावर संभाव्य होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने २४ डिसेंबर ते ५ जानेवारी असे सलग १२ दिवस रस्ता सुरळीत चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने भाविकांसह, गडावरील व्यापारी, ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले.
वरील नियोजित तारखांना काम होणे आवश्यक असल्याने रस्ता वाहतुकीस बंद ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापनानुसार व सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ४ कळवण यांच्याकडील दि. १८/११/२०२४ पत्रान्वये सप्तश्रृंगी गड ते नांदुरी रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाययोजना अंतर्गत कामाकरीता नांदुरी ते सप्तश्रृंगीगड हा रस्ता दिलेल्या तारखांना सकाळी ६ ते दुपारी ११.३० या वेळेत घाटमार्गातील रस्त्यावरील सैल खडक व दरड काढण्यासाठी बंद करण्यात येणार आहे.