Nashik News | राज्याच्या तिजोरीत नाशिक ‘आरटीओ’चा 440 कोटी महसूल

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

31 Jan 2025, 9:39 am

Updated on

31 Jan 2025, 9:39 am

नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) मागील वर्षात 440 कोटी दोन लाख 55 हजार रुपयांचा महसूल जमा करून राज्याच्या तिजोरीत भरीव भर टाकली आहे. राज्यभरातील ‘आरटीओं’नी एकूण 13 हजार 13 कोटी 15 लाख रुपयांचा महसूल संकलित केला आहे, ज्यामध्ये सर्वाधिक महसूल मोटार वाहन कराच्या माध्यमातून मिळाला आहे.

राज्यातील सर्वाधिक कर संकलन करणाऱ्या पहिल्या पाच विभागांमध्ये ‘आरटीओ’चा समावेश असतो. नाशिक आरटीओनेदेखील विविध करसंकलनाच्या माध्यमातून 440 कोटी रुपयांचा भरणा केला असून, त्यामध्ये मोटार वाहन कर, हरित कर आणि रस्ता सुरक्षा निधीचा वाटा मोठा आहे. विशेषतः, वाहन खरेदीच्या वेळी एकरकमी कर आकारला जात असल्याने करसंकलनात मोठी वाढ झाली आहे. त्याशिवाय, हरित कर, रस्ता सुरक्षा निधी आणि वाहतूक शिस्तभंग करणाऱ्या वाहनचालकांवरील कारवाईतूनही महसूल वाढीस हातभार लागला आहे.

  • एक रकमी मोटार वाहन कर - 425 कोटी 52 लाख 8 हजार 527

  • हरित कर - 6 कोटी 19 लाख 13 हजार 211

  • रस्ता सुरक्षा फंड - 8 कोटी 31 लाख 33 हजार 333

जिल्ह्यात 1.20 लाख वाहनांची नोंद

जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत जिल्ह्यात एक लाख 19 हजार 837 वाहनांची नोंद झाली. त्यात सर्वाधिक 84 हजार 545 दुचाकी, दोन हजार 771 तीनचाकी, 20 हजार 331 चारचाकी, सात हजार 385 इलेक्ट्रिक वाहने व 12 हजार 190 इतर वाहनांचा समावेश आहे.

3,181 चालकांचे परवाने निलंबित

भरधाव आणि धोकादायक ओव्हरटेक करणाऱ्या आठ हजार 340 वाहनचालकांवर, 188 मद्यपी चालकांवर, रिफ्लेक्टर व टेल लाइट नसलेल्या दोन हजार 806 वाहनचालकांवर तसेच मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या 28 चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईअंतर्गत एकूण आठ कोटी 81 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, तीन हजार 181 वाहनचालकांचे परवाने निलंबित केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article