Nashik | धक्कादायक ! पत्नीच्या छळाला कंटाळून सॉफ्टवेअर इंजिनियरने संपविले जीवन

1 hour ago 2
पुढारी वृत्तसेवा

Published on

23 Sep 2024, 7:19 am

Updated on

23 Sep 2024, 7:19 am

नाशिक : पत्नी व सासरच्या नातलंगाकडून होणाऱ्या मानसिक, शारीरिक छळाला कंटाळून सॉफ्टवेअर इंजिनियर युवकाने जीवन संपविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात युवकाच्या पत्नीसह सासरच्या नातलगांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल गणपत थेटे (रा. गिरणारे) असे युवकाचे नाव आहे. सरिता गणपत थेटे यांच्या फिर्यादीनुसार, राहुल सॉफ्टवेअर इंजिनियर होता. त्याचा विवाह २०२१ मध्ये भगूर येथील पल्लवी नंदू हारक हिच्यासोबत झाला होता. विवाहानंतर पल्लवी राहुल व सासू सरिता यांना शिवीगाळ करीत वाद घालत होती. तसेच राहुलला मारहाण करीत माहेरी निघून जात होती. पती राहुलवर खोटे आरोप करून जीवाचे बरे वाईट करेन अशीही धमकी देत होती. त्याचप्रमाणे राहुलचे सासू-सासरे व इतर नातलगही राहुलला धमकावत, दमदाटी करीत असल्याचा आरोप सरिता यांनी केला. १५ सप्टेंबरला राहुल व पल्लवीत वाद झाला त्यावेळी पल्लवीने राहुलला मारहाण करीत शिवीगाळ केली. तसेच पल्लवीने त्या दिवशी स्वयंपाक केला नाही. या त्रासाला कंटाळून राहुलने राहत्या घरात गळफास घेत जीवन संपविले. . त्यामुळे पत्नी पल्लवी, सासरे नंदू रामनाथ हारक, सासू अनिता नंदू हारक, मेव्हणा अंकेश नंदू हारक, पल्लवीचा मावस मामा रामदास शिवदास धांडे, मावस मामी माधुरी रामदास धांडे यांच्याविरोधात राहुलला टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीवन संपविण्यापूर्वी चिठ्ठी, व्हिडीओत राहुलचे आरेाप

सरीता थेटे यांच्या फिर्यादीनुसार, राहुलने आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत पत्नी व सासरच्या नातलगांविरोधात तक्रार आहे. तसेच पल्लवीकडून होणारी शिवीगाळ व मारहाणीचे व्हिडीओ देखील राहुलने काढले. त्यावरून नाशिक तालुका पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article