Nashik | हद्दपार गुंडाकडून कोयत्याचा धाक दाखवून व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

02 Oct 2024, 8:20 am

Updated on

02 Oct 2024, 8:20 am

नाशिक : हद्दपार असतानाही विनापरवानगी शहरात वास्तव्य करून गुंडाने सुभाष रोडवरील एका दुकानचालकास कोयत्याचा धाक दाखवून दरमहा पाच हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सनी श्याम भाटिया (रा. गुलजारवाडी, नाशिक रोड) असे या गुंडाचे नाव आहे. गोपाल ईश्वरदास किशनानी (४९, रा. जेल रोड) यांच्या फिर्यादीनुसार नाशिक रोड पोलिसांनी सनीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

गंभीर गुन्हे दाखल असल्याने शहर पोलिसांनी भाटियाला हद्दपार केले होते. त्यानंतरही त्याने २६ सप्टेंबरला रात्री ९ वाजता के. बी. एन. मार्केटमधील राजधानी जनरल स्टोअर्स चालक किशनानी यांना कोयत्याचा धाक दाखवून दरमहा पाच हजार रुपयांची खंडणी मागितली. किशनानी यांनी सोमवारी (दि. ३०) नाशिक रोड पोलिसांकडे तक्रार केली. यापूर्वीही भाटियाने किशनानी यांना खंडणीसाठी धमकावल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

हद्दपारीची कार्यवाही झाल्यानंतर सनी शहरातच वास्तव्य करत असल्याचे आढळून आले. त्याने गुन्हे करून सुभाष रोड भागातील व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हद्दपार करूनही तो शहरातच ठाण मांडून खंडणी मागत असल्याचे उघड झाल्याने हद्दपारीची कारवाई नावालाच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article