PAK vs ENG : पाकिस्तान विजयाासून 8 विकेट्स दूर, इंग्लंडला आणखी 261 धावांची गरज, कोण जिंकणार?

2 hours ago 1

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसर्‍या दिवसाचा खेळ आटोपला आहे. पाकिस्तानने इंग्लंडला विजयासाठी 297 धावांचं आव्हान दिलं आहे. इंग्लंडने या विजयी आव्हानाचा पाठलाग करताना खेळ संपेपर्यंत 11 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 36 धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी आणखी 261 धावांची गरज आहे. तर पाकिस्तान विजयापासून 8 विकेट्स दूर आहे. सामना रंगतदार स्थितीत असल्याने चौथ्याच दिवशी निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. अशात आता पाकिस्तानकडे दुसर्‍या सामन्यात विजय मिळवून पहिल्या पराभवाचा वचपा घेत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडकडे सलग दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी आहे. आता या प्रयत्नात कोण यशस्वी ठरतं, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

तिसऱ्या दिवसात काय झालं?

पाकिस्तानने पहिल्या डावात 366 धावा केल्या. इंग्लंडने तिसऱ्या दिवसाच्या खेळाला 6 बाद 239 धावांपासून सुरुवात केली. मात्र इंग्लंडला तिसऱ्या दिवशी 4 विकेट्स गमावून 52 धावाच जोडता आल्या. इंग्लंडचा पहिला डाव अशाप्रकारे 291 वर आटोपला. त्यामुळे पाकिस्तानला 75 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडकडून पहिल्या डावात बेन डेकट याने सर्वाधिक 114 धावांची खेळी केली. तर इतरांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र त्यांना मोठा खेळी करता आली नाही. पाकिस्तानकडून साजिद खान याने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. तर नोमान अलीने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर पाकिस्तानने 75 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाला सुरुवात केली. पाकिस्तानचा हा डाव 59.2 ओव्हरमध्ये 221 धावांवर आटोपला. पाकिस्तानकडून आघा सलमान याने सर्वाधिक 63 धावा केल्या. तर इतरांनी छोटेखानी खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानला 200 पार मजल मारता आली. तर इंग्लंडकडून दुसऱ्या डावात शोएब बशीर याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. जॅक लीचने तिघांना मैदानाबाहेर पाठवलं. ब्रायडन कार्सने 2 विकेट्स मिळवल्या. तर मॅथ्यू पॉट्सने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

इंग्लंडची बॅटिंग

इंग्लंड 297 या विजयी धावांसाठी मैदानात आली. मात्र इंग्लंडची वाईट सुरुवात झाली. बेन डकेट याला भोपळाही फोडता आला नाही. तर झॅक क्रॉली 3 धावांवर बाद झाला. त्यामुळे इंग्लंडची स्थिती ही 2 बाद 11 अशी झाली. मात्र त्यानंतर जो रुट आणि ओली पोप या दोघांनी संयमाने खेळ पुढे नेला. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तोवर इंग्लंडने 11 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 36 धावा केल्या. जो रुट 12 आणि ओली पोप 21 धावांवर नाबाद परतले आहेत. तर पाकिस्तानकडून साजीद खान आणि नोमान अली या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली आहे. आता चौथ्या दिवसाच्या खेळाकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

चौथ्या दिवशी निकाल लागणार!

Pakistan’s prima rotation duo Noman and Sajid removed the 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 openers successful the last hr ☄️

We’ll beryllium backmost time for the Day 4 enactment from Multan 🏏#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/8YAqYBRmNb

— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 17, 2024

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कर्णधार), सैम अयुब, अब्दुल्ला शफीक, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, नोमान अली, साजिद खान आणि जाहिद महमूद.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), मॅथ्यू पॉट्स, ब्रायडन कार्स, जॅक लीच आणि शोएब बशीर.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article