Published on
:
16 Nov 2024, 7:37 am
Updated on
:
16 Nov 2024, 7:37 am
हिरवागार भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य
कच्च्या पालकाची प्युरी, तांदूळ, लसूण, मिरपूड, तेल, चवीप्रमाणे मीठ.
कृती
तांदूळ शिजवून भात करून घ्या आणि गार होण्यासाठी ठेवा. दुसरीकडे कढईत तेल गरम करून त्यात लसूण, पालकाची प्युरी आणि मीठ घाला. या मिश्रणाला एक वाफ काढून पालक शिजवून घ्या. आता यात मिरपूड आणि गार झालेला, मोकळा करून ठेवलेला भात घाला. सर्व पदार्थ नीट एकत्र होतील अशा पद्धतीने मंद आचेवर मिसळून घ्या. एक छान वाफ आल्यावर हिरवागार पौष्टिक भात खायला घ्या.