रिसोड (Risod) :- ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ मतदान जनजागृती रॅलीची दिमाखदार सुरुवात दि. 16 नोव्हेंबर 2024 रोजी रिसोड शहरातील वाशिम नाका येथून रॅलीला सुरुवात झाली. सर्वप्रथम या रॅलीला रिसोड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रतीक्षा तेजनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश शेवदा नगर परिषद रिसोड,सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत तहकीक पोलीस स्टेशन रिसोड, शहरातील पत्रकार बांधव, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते रिबीन कापून शाळेच्या निवडणूक जनजागृती रॅलीच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.मतदार राजा मतदान कर,मतदानाची शपथ घेऊन उपस्थित मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. मान्यवरांच्या उपस्थिती मुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निमित्त स्व. माणिक पोदार लर्न स्कूल च्या विद्यार्थ्यांची पथनाट्य व प्रभात फेरी च्या माध्यमातून मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली.विधानसभा निवडणुकीत मतदानाची (Voting)टक्केवारी वाढावी, प्रत्येक नागरिकांचा मतदानात सहभाग वाढावा, यासाठी शाळेच्या वतीने रॅली चे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या वतीने नेहमीच अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात त्यापेकी हा एक. या माध्यमातून आपण लोकशाही चा भाग आहोत, आदर्श समाज घडविण्यासाठी तसेच देशाला प्रगतीवर नेण्यासाठी आपला मतदानाचा हक्क आपण नक्कीच बजावला पाहिजे या हेतूने शाळेने या रॅलीचे आयोजन केले.
3 री ते 10 वी च्या विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी रॅली मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला
महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra govt)मार्फत वेगवेगळ्या माध्यमातून मतदान जनजागृती सुरू आहे. आमचे चांगले भविष्य घडवायचे असेल, देशाला विकासाच्या मार्गावर न्यायचं असेल तर तुम्ही येणार्या विधानसभा निवडणुकीत मतदान केलेच पाहिजे अशी साद विद्यार्थ्यांनी परिसरातील जनतेला केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनासोबत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कंबर कसली आहे. सर्व विद्यार्थी मतदान जागृती उपक्रमात सहभागी झाले. आमच्या येणाऱ्या पिढीसाठी, आमच्या उज्वल भविष्यासाठी मतदार करा असा संदेश चिमुकल्यांनी दिला.शाळेतील वर्ग 3 री ते 10 वी च्या विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी रॅली मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. जनजागृती रॅली वाशिम नाका, सिव्हिल लाईन, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, गुरुवार बाजार, लोणी फाटा या मार्गाने काढण्यात आली.
मतदान आपला अधिकार, नका घालवू वाया’ ‘वोट डालने जाना है, अपना फर्ज निभाना है’
पथनाट्य (street play) , घोषणामधून मतदार जागृतीचा संदेश, माझं मत माझं भविष्य, मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, छोडो अपने सारे काम पहिले करू मतदान, ‘मतदान आपला अधिकार, नका घालवू वाया’ ‘वोट डालने जाना है, अपना फर्ज निभाना है’ ‘बुढे हो या जवान, सभी करे मतदान’, ‘छोडो अपने सारे काम, चलो करे पहले मतदान’ अशा घोषण देत विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीचा संदेश दिला. या सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे स्व माणिक पोदार लर्न स्कूल वाढोणा चे अध्यक्ष विनायकराव जाधव, संचालक मंडळातून सीमा मापारी, शाळेचे प्राचार्य हर्षल वासेवाल, मुख्याध्यापिका नर्गिस अंजुम सेंटर हेड शारदा अंभोरे, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने शाळेतील चिमुकल्यांचे कौतुक केले. लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने आपला मतदान करण्याचा अधिकार बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे. तसेच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येणे आवश्यक आहे. स्व. माणिक पोदार लर्न स्कूल, वाढोणा च्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती रॅली काढल्याबद्दल कौतुक केले.