शिक्षण आयुक्त सूरज मांढरे Pudhari News Network
Published on
:
16 Nov 2024, 11:23 am
Updated on
:
16 Nov 2024, 11:23 am
जळगाव : भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे मतदान पार पडणार आहे. निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांना आपला मतदान हक्क बजावता यावा या करीता २० नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मात्र राज्यात मतदानाच्या दिवशी शाळांना सुट्टी असली, तरी मतदानाच्या आधी २ दिवस सुट्टीवरुन शाळा व्यवस्थापन, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तरी शिक्षण विभागाने यासंदर्भात एक परिपत्रक सादर करत सर्व गोंधळ दुर केला आहे. शासन आदेशानुसार राज्यात १८ आणि १९ नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार आहेत. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी एका परिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
परिपत्रकानुसार १८ व २० नोव्हेंबर रोजी म्हणजेच मतदानाच्या २ दिवस आधी शाळांना कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही, अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापतक यांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी. अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरु राहतील. विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक यांनी सुट्टी जाहीर करावी. तसेच ही सरसकट व सार्वजनिक सुट्टी नाही याची नोंद सर्वांनी घेऊन कोणत्याही शाळा अनावश्यकरित्या बंद राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी केले आहे.