Published on
:
16 Nov 2024, 11:36 am
Updated on
:
16 Nov 2024, 11:36 am
सिल्लोड पुढारी वृत्तसेवा : सिल्लोडला पाकिस्तान बांगलादेश म्हणून उपमा देणाऱ्यांना या निवडणुकीतून कायमचे हद्दपार करण्याची वेळ आली आहे. या अपमानाचा बदला घेण्यासाठी हजारो व्यापाऱ्यांनी स्वतःला प्रचारात झोकून दिले आहे. ही त्यांची झलक असून पिक्चर अजून बाकी आहे.
२३ तारखेला निकालानंतर काहीजण कपडे फाडताना दिसतील अशी टीका महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी शिवना येथील प्रचार सभेत केली. शिवसेना महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ शिवना येथे आयोजित प्रचार सभेत महायुतीच्या वक्त्यांनी आक्रमक भाषणातून उद्धव सेनेच्या उमेदवारावर घनाघात करीत त्यांची कुचकामी वृत्ती व निष्क्रियतेची लक्तरे वेशीवर टांगली. अब्दुल सत्तार यांनी शिवन्यातील ही सभा आपल्या विजयावर ठसा उमटवणारी असल्याचे प्रतिपादन केले. सभेला संबोधित करताना शिवसेना महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार बोलताना म्हणाले २००९ च्या निवडणुकीत सारेच हिंदुत्ववादी पक्ष संघटना सोबत असताना २५ हजारांनी तर २०१४ मोदी लाटेत १५ हजारांनी आता हिंदुत्ववादी पक्ष संघटना, नरेंद्र मोदी व भगवा झेंडा माझ्यासोबत असल्याने त्यांची आता खैर नाही.
कार्यकर्ते मतदार पेटून उठले असून विर- ोधकांना कायमचा आराम देतील. सत्तार म्हणाले. मतदार संघात प्रत्येक गावात विकास कामे सुरू आहे. मेडिकल कॉलेज, सूतगिरणीचे काम प्रगतीपथावर असून यातून कापूस ते कापड प्रक्रिया टेक्सटाईल पार्क होणार आहे. कोर ोनाच्या काळात मी रस्त्यावर उतरून लोकांची मदत करत होतो. निवडणुकीत अचानक उदयास आलेली ही मंडळी कुठे होती मतदारांनी त्यांना विचारले पाहिजे असा टोला अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना लगावला. रामदास पालोदकर, रमेश दांडगे अन्वीकर, देविदास लोखंडे, विजयआबा दौड, राजाराम पाडळे, प्रभाकर पारधे, प्रा. गोविंदराव भोजने, विठ्ठल महाराज दांडगे, श्रीराम महाजन आदींनी अब्दुल सत्तार यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले.
अब्दुल सत्तार यांना मतदान करून विरोधकांना घरी बसवा. केशवराव पा. तायडे
मतदार विरोधकांची डिपॉझिट जप्त करतील - अर्जुन गाढे
गोळेगाव येथील स्मशानभूमीला अब्दुल सत्तार यांनी निधी मंजूर करून दिला. श्रीरंग साळवे
अब्दुल सत्तार यांची गाडी बुलेट ट्रेन असल्याने त्यांच्या समोर विरोधकांची काय बिसाद. विनोद मंडलेचा अब्दुल सत्तार यांनी हिंदू तीर्थक्षेत्रांना शेकडो कोटींचा विकास निधी दिला मग ते जातीवादी कसे. संजय डमाळे
महायुतीशी गद्दारी करणाऱ्यांना जनता घडा शिकवणार. - सुदर्शन अग्रवाल
अब्दुल सत्तार सामान्य जनतेची चूल पेटणारे नेतृत्व, विरोधक मात्र आग लावणारे. दामोदर गव्हाणे
शिवना येथील एक टोळका व्यापाराचा वैभव संपायला निघाला आहे. - राजूबाबा काळे