पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका दुसऱ्या पराभवानंतर गमावली आहे. दुसऱ्या टी20 सामन्यात पाकिस्तानसमोर विजयासाठी फक्त 148 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पाकिस्तानने 19.4 षटकात सर्वबाद 134 धावा केल्या. विजयासाठी 13 धावा तोकड्या पडल्या आणि मालिका गमवण्याची वेळ आहे. खरं तर पाकिस्तानसाठी हे सोपं आव्हान होतं. पण एखाद दुसरा फलंदाज वगळता बाकी सर्वच फलंदाज फेल गेले. इतकंच काय तर 4 फलंदाजांना आपलं खातंही खोलता आलं नाही. चार फलंदाज शून्यावर बाद होण्याची पाकिस्तानची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2013 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध अशी नामुष्की ओढावली होती. या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने आपलं मत व्यक्त केलं आहे. इतकंच काय तर आपल्या संघ सहकाऱ्यांची इज्जत काढली. कर्णधार मोहम्मद रिझवान यांनी सांगितलं की, ‘गोलंदाजांनी खरोखरच चांगली गोलंदाजी केली. पण जर तुम्ही महत्त्वाचे झेल सोडले तर तुम्हाला खेळाची किंमत मोजावी लागेल. आपल्या सर्वांना माहित आहे की खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी नव्हती. झेल निर्णायक ठरले. वेग आणि उसळीमुळे हॅरिसला ऑस्ट्रेलिया भावते. तिसऱ्या सामन्यातील बदलांबाबत खात्री नाही. परिस्थिती काय मागणी करते ते पाहू.’
पाकिस्तानच्या खेळाडू झेल सोडतात, यासाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. झेल सोडण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पाकिस्तानने तीन झेल सोडले. सहाव्या षटकात पाकिस्तानने पहिला झेल सोडला. हरिस रउफने स्टोयनिसला टाकलेला चेंडू बॅटचा कोपरा घासून गेला. पण पहिल्या स्लीपला असलेल्या सलमानला हा झेल पकडता आला नाही. त्यानंतर आठव्या षटकात स्टोयनिसला पुन्हा एकदा जीवदान मिळालं. शाहीनने त्याचा झेल पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण अपयश आलं. त्यानंतर हारिस रउफ टाकत असलेल्या 15 व्या षटकात टिम डेविडचा झेल सोडला. यावेळी बाबर आझमने चूक केली. मिड विकेटजवळ सोपा झेल सोडल्याने आश्चर्य व्यक्त गेलं. हरीस रउफने 4 षटकात 22 धावा देत 4 गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जोस इंग्लिसने विजयासाठी सांगितले की, ‘आम्ही खूप चांगली सुरुवात केली. शीर्षस्थानी असलेल्या फलंदाजांनी आम्हाला फ्लायरकडे नेले.त्यांनी गोलंदाजी केली म्हणून ते मधल्या फळीत फलंदाजी कठीण होते.’ दुसरीकडे इंग्लिसने कर्णधारपदावर सांगितलं की, हे कर्णधारपद कठीण काम आहे. तो ड्रॉप कॅच पाहता, मी किपिंगपेक्षा कर्णधारपदाचा विचार करत होतो.